28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरदेश दुनियानिवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी पुन्हा परदेशात पळाले

निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी पुन्हा परदेशात पळाले

Google News Follow

Related

काँग्रेस पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष हे इटलीच्या दौऱ्यावर गेले आहेत. देशात महत्वाच्या पाच राज्यांच्या निवडणूका या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच राहुल गांधी हे परदेशवारीवर गेल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी हे १५ जानेवारीपर्यंत भारतात परतणार नसल्याचेही समजते. राहुल गांधी यांच्या परदेशवारीवरून विरोधक कायमच काँग्रेस पक्षाला चिमटा काढत असतात. तर राहुल गांधी हे कायमच महत्वाच्या निवडणुकांच्या तोंडावर परदेशात जात असल्याने त्यांच्यावर टीका देखील होत असते.

काँग्रेस पक्षातर्फ़े मात्र राहुल गांधींच्या या परदेशवारीची पाठराखण केली जात आहे. राहुल गांधी हे त्यांच्या खासगी कारणासाठी इटलीला गेले असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात येत आहे. तर या गोष्टीचे राजकारण करण्यात येऊ नायटे असे देखील काँग्रेस म्हणताना दिसत आहे. काँग्रेस प्रवक्ते राणदीप सुरजेवाला यांनी या विषयात भाजपावर टीका केली आहे. राहुल गांधी हे त्यांच्या खासगी कारणासाठी इटलीला गेले आहेत. पण भाजपा आपल्या माध्यमांतील मित्रांना हाताशी धरून अफवा पसरवत आहे असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. तर ट्विटरवर देखील राहुल गांधी यांना विनाकारण ट्रोल केले जात आहे असे सुरजेवाला यांनी सांगितले.

हे ही वाचा:

बांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय?

राजेश टोपेंना मिळणार ‘घोटाळेरत्न’ पुरस्कार

रणझुंजार नव्हे तर घरझुंजार! अतुल भातखळकर यांची टोलेबाजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

पंजाबमधली प्रचारसभा टाळून इटलीवारी!
सध्या देशभर उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या पाच राज्यांपैकी पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. ही सत्ता टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे. त्यासाठी निवडणूक प्रचाराची सुरुवात ३ जानेवारी रोजी राहुल गांधी यांच्या प्रचार सभेने होणार होती. पण आता राहुल गांधी इटलीला जाऊन बसल्याने ही प्रचारसभा रद्द होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा