राहुल गांधींना कळेना पूर आणि तुंबलेल्या पाण्यातला फरक

राहुल गांधींना कळेना पूर आणि तुंबलेल्या पाण्यातला फरक

काँग्रेस नेते राहुल गांधी हे अनेकवेळा आपल्या वक्तव्यामुळे चेष्टेचा विषय बनत असतात. बिहारमध्ये तुंबलेल्या पाण्याची तुलना पुराशी केल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या कॅबिनेटमधील सहकारी मंत्री संजयकुमार झा यांनी त्यांना चिमटा काढत पूर आणि तुंबलेले पाणी यातला फरक ओळखण्यास सांगितले आहे.

संजय कुमार झा यांनी ट्विट करून राहुल गांधी यांना विचारणा केली आहे की, तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती पुरवलेली दिसते की, बिहारमध्ये पूर आला आहे. तशी अजिबात परिस्थिती नाही. मुसळधार पाऊस पडला तर तशी परिस्थिती येऊही शकते पण पूर आणि पाणी तुंबणे यातील फरक तुम्ही नक्कीच ओळखू शकता. या दोन्हीमध्ये गोंधळ होऊ देऊ नका.

हे ही वाचा:

धडधाकट झाडांवर पालिकेची कुऱ्हाड

मॅकॅफी अँटीव्हायरसचे संस्थापक जॉन मॅकॅफी आढळले मृतावस्थेत

नवी मुंबई विमानतळ, भूमिपुत्रांचे घेराव आंदोलन सुरु

बापरे! मोबाईल चोरामुळे इसम गंभीर जखमी

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत विचारले आहे की, बिहारमधील पावसामुळे साचलेल्या पाण्याला राहुल गांधी यांनी पूर म्हटल्यावर बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना गोड शब्दांत खडसावले. पंतप्रधानपदाच्या दावेदाराला पूर आणि साचलेल्या पाण्यातला फरक कळू नये किंवा कळत असूनही जाणूनबुजून भ्रम पसरविण्यासाठी असे ट्विट करणे ही जनतेची क्रूर थट्टा आहे.

राहुल गांधी यांनी असे ट्विट केले होते की, बिहारमधील पूरग्रस्त कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. करोनाच्या या कालखंडात हे संकट अधिक गंभीर आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की, त्यांनी या परिस्थितीत बचावकार्याला हातभार लावावा. काँग्रेसची ही खरी ओळख आहे.

राहुल गांधी यांच्या ट्विटला संजय कुमार झा यांनी मग उत्तर दिले. ते आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात की, राहुल जी, संकटकाळात बिहार सरकार बचावकार्यासाठी कार्यरत असते. राज्य सरकार चुकीच्या बातम्या पसरविण्यात वेळ घालवत नाही. वास्तव हे आहे की, २३ जूनला बिहारमधील कोणत्याही नदीला पूर आला नव्हता.

झा यांनी आपल्या या ट्विटसोबत राज्यातील नद्यांच्या स्थितीची माहितीही जोडली आहे.

Exit mobile version