मोदी या आडनावावरून आक्षेपार्ह टिप्पणी करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती तसेच जामीनही देण्यात आला होता. पण या शिक्षेमुळे लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे पत्र दिले आहे.
सूरत येथे गुरुवारी राहुल गांधी यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. कर्नाटक येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी म्हटले होते की, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी असे सगळे मोदी नावाचे लोक कसे काय चोर असतात? यावरून गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. ही शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी आपण हे विधान करून कुणलाही दुखावले नाही, तसे दुखावण्याचा हेतू नव्हता अशी प्रतिक्रिया दिली होती.
हे ही वाचा:
दिब्रुगड तुरुंगातील वेगवेगळ्या सेलमध्ये कैद आहेत अमृतपालचे सहकारी
पासपोर्ट मिळाला नाही..अमृतपाल परदेशात पलायन करणार ?
अमेरिकेच्या लष्करावर ड्रोनने हल्ला ,पाच सैनिकांचा मृत्यू
‘पंतप्रधानांचा अपमान देशातील जनता सहन करणार नाही’
लोकसभेच्या नियमानुसार ज्या सदस्याला दोन वर्षांची किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा होईल त्याचे सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद आहे.
जेव्हा सूरत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली तेव्हाच दोन वर्षांच्या शिक्षेमुळे राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द होईल, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. हा नियम संसदेतील खासदारांसाठी तसेच विधानसभेतील आमदारांसाठीही आहे.