राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच

आपल्या कुटूंबाची ईडी मार्फत चौकशी सुरू केल्यानंतर लोकशाहीची कशी हत्या झाली आहे असा सूर आळवायला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरूवात केली आहे.

राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 100

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर आज, ५ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली.

“भारतातील लोकशाहीची सध्या हत्या सुरु आहे. चार लोकांची इथे हुकुमशाही सुरु आहे. काँग्रेसने इतक्या वर्षात जे गमावलं आहे ते भाजपाने गमावलं आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. देशातल्या बेरोजगारीवर, महागाईवर संसदेत चर्चा होत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. वास्तविक चित्र वेगळंच आहे आणि दाखवलं वेगळंच जात आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.

“देशातल्या समस्यांबद्दल बोलायला गेलं की सीबीआय आणि ईडी मागे लावली जाते. कोरोना काळात भारताने चांगली कामगिरी केल्याचे केंद्र सरकार सांगते मात्र युनायटेड नेशन्सने दिलेली मृतांची आकडेवारी खोटी असल्याचं सांगितलं जात. वाढत्या महागाईचे आकडे अर्थ मंत्र्यांना दिसत नाहीत का?,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

हे ही वाचा:

थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी

पुलवामामध्ये ग्रेनेड हल्ल्यात मजुराचा मृत्यू

टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे उपस्थित होते. “देशात ईडीची दहशत असल्याची टीका अशोक गेहलोत यांनी केली आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांची गळचेपी केली जात आहे. माध्यमांनी धैर्य दाखवूनपुढे यायला हवे. आज जर गप्प बसलो तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही,” अशी टीका त्यांनी केली.

Exit mobile version