संसदेत राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रगतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न संसदेतील आपल्या भाषणात केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी आपले अर्धा पाऊण तासाचे संपूर्ण भाषण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यावर बोलण्यात खर्च केले.
त्याआधी, अग्निवीर हा उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केल्याचा शोध त्यांनी लावला. तसेच ही संकल्पना सुरक्षा प्रमुख अजित डोवाल यांची असल्याचेही ते म्हणाले. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. असे आरोप आपण करू शकत नाही, असे सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आले. पण राहुल गांधी तरीही बोलत राहिले.
ते म्हणाले की, मी लष्करातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की, आम्हाला वाटते की ही योजना लष्कराकडून आलेली नाही. राहुल गांधी म्हणाले की, तरुण म्हणतात की, लष्कराची सेवा १५ वर्षांची होती, पेन्शन मिळत होती आता ४ वर्षानंतर काढून टाकले जाईल, पेन्शन नसेल. आणखी सीनियर ऑफिसर मला म्हणाले की, अग्निवीर योजना लष्करावर ही योजना लादण्यात आली आहे.
हे ही वाचा:
जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा
मुंबईकरांसाठी खुशखबर पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरु
कुठला शिवसंवाद हा तर स्वसंवाद!
मारहाणप्रकरणी राखी सावंतच्या पतीला घेतले ताब्यात
नंतर राहुल गांधी यांनी अदानी या विषयाला हात घातला. मात्र त्यात कोणतेही पुरावे, तथ्य यांची मांडणी त्यांनी केली नाही. केवळ आरोपांची राळ उडविली. ते म्हणाले की, अदानी कोणत्याही बिझनेसमध्ये शिरतात आणि यशस्वी होतात. ते अपयशी ठरत नाहीत.
श्रीमंतांच्या यादीत अदानी ६०९ नंबरवर होते. जादू झाली आणि दुसऱ्या नंबरवर पोहोचले. पोर्ट्स, एअरपोर्टस, रस्ते सगळीकडे अदानीच दिसू लागले. याचा भारताच्या पंतप्रधानांशी काय संबंध आहे.
एअरपोर्टचा विचार केला तर काही वर्षांपूर्वी सरकारने भारतातील एअरपोर्ट्स विकासाकरिता दिले. नियम होते त्याप्रमाणे एअरपोर्ट बिझनेसमध्ये नसेल त्याला काम सोपविता येत नव्हते मग अदानी यांच्याकडे काम कसे सोपविण्यात आले. हा नियम बदलला. अदानींना सहा एअरपोर्ट दिले गेले. त्यानंतर नफ्यातील जीव्हीके मुंबई एअरपोर्ट अदानींनी घेतले.
राहुल गांधी यांच्या या भाषणावर कायदामंत्री किरण रिजिजू यांनी आक्षेप घेतला ते म्हणाले की, असे आरोप करताना तर्क ठेवायला हवे. त्यावर काँग्रेस खासदार अधिरंजन चौधरी म्हणाले की, कागदोपत्री पुरावे देऊ.