सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली

कॉंग्रेसने केले आरोप

सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली

जम्मूतील बनिहलमध्ये ‘भारत जोडो यात्रा’ अचानक थांबविण्यात आली असून कॉंग्रेसच्या नेत्यांनी भारत जोडो यात्रेला सुरक्षा न दिल्याने ही यात्रा थांबविल्याची माहिती आता समोर येत आहे.

भारत जोडो यात्रा सध्या जम्मू मधील बनिहलमध्ये येथे जाऊन पोहचली आहे. भारत जोडो यात्रेला सुरक्षा न मिळाल्याने ही यात्रा कॉंग्रेसच्या वतिने थांबविण्यात आली आहे. जोपर्यंत सुरक्षा मिळणार नाही तोपर्यंत यात्रा पुढे जाणार नाही असा पवित्रा कॉंग्रेसने घेतला आहे.

भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते सहभागी झाले आहे. कन्याकुमारी पासून सुरू झालेली हि यात्रा थेट जम्मू येथे जाऊन पोहचली आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील ही यात्रा सुरू असून राहुल गांधी यांचा हजारो किलोमीटरचा पायी प्रवास झाला आहे. जम्मू येथे नुकतेच महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सहभागी झाले होते. जम्मू येथे जाऊन पोहचलेली भारत जोडो यात्रा सुरक्षाच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. जम्मू येथील सरकारने सुरक्षा न दिल्याने ही यात्रा खोळंबली आहे. कॉंग्रेसचे नेतेही सुरक्षे च्या कारणामुळे आग्रही आहेत भारत जोडो यात्रा विविध कारणांमुळे चर्चेत आली आहे.

हे ही वाचा:

बागेश्वर बाबांना नागपूर पोलिसांची क्लीन चीट

बंधुभाव आणला तर स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने होईल साकार

श्याम मानव आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी माफी मागावी

बॉक्सिंग फेडरेशनने निलंबित केलेले असतानाही जय कवळी ऑलिम्पिक संघटनेत कार्यरत कसे?

जम्मूतील बनिहलमध्ये ही यात्रा मात्र अचानक सुरक्षा न दिल्याने ही यात्रा थांबविल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी यांच्यासह या भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसचे बडे नेते सहभागी झाले असून सुरक्षा न दिल्याने कॉंग्रेसचे नेते आक्रमक झाले आहे जम्मू सरकारने सुरक्षा न दिल्याने कॉंग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कन्याकुमारीपासून राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रत्येक राज्यात सुरक्षा मिळाली होती. अचानक जम्मूत सुरक्षा नसल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आता दिसत आहे.

भारत जोडो यात्रेची ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये सांगता

सात सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेला मोर्चा गुरुवारी रात्री पंजाबमधून जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाला. श्रीनगरमध्ये ३० जानेवारी रोजी राहुल गांधी यांच्या हस्ते काँग्रेस मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकवून यात्रेची सांगता होणार आहे.

Exit mobile version