काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या १० दिवसांच्या दौऱ्यावर असून तिथे त्यांनी भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान करण्यासाठी तिथल्या मंचाचा वापर केला. पुढील १० दिवसांत विविध ठिकाणी त्यांची भाषणे होणार असून तिथेही ते भाजपा, भारत सरकार आणि नरेंद्र मोदी यांना ते लक्ष्य करू शकतात.
सॅन फ्रॅन्सिस्को येथे आयोजित मोहोब्बत की दुकान या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी फक्त भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढली होती. चालत असताना आम्हाला जाणीव झाली की, राजकारण करण्यासाठी ज्या साधनांचा वापर करायचा ते करणे शक्य नाही. कारण त्यावर भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसची पकड आहे. तुम्हाला राजकीय भूमिका घेणेही तिथे अवघड होते. त्यामुळे मग आम्ही दक्षिण भारत ते श्रीनगर अशी पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
कांदिवलीतील प्रेमप्रकरणातून हत्या करणाऱ्या प्रयागराज येथून अटक
बकरीचोर समजून तीन अल्पवयींना मारहाण; एकाचा मृत्यू
व्यसने सोडा, तोंड स्वच्छ ठेवा…सचिन सदिच्छादूत
मणिपूर हिंसाचारप्रकरणी मृतांच्या वारसांना १० लाखांची भरपाई
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, भारतातील काही लोकांना हा रोग आहे ज्यामुळे त्यांना सतत असे वाटते की, त्यांना सगळे कळते. भारतात विविध भाषा, विविध धर्माच्या लोकांसोबत राहिलो आहोत पण आता त्यावरच आक्रमण होत आहे.
गांधीजी, गुरु नानकजी यांनी आपल्याला सांगितले की, तुम्हाला सगळे काही येते या भ्रमात राहू नका. पण काही समुहांना हे वाटते की, त्यांना सगळे कळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यापैकी एक आहेत, असे सांगत राहूल गांधी म्हणाले की, जर तुम्ही त्यांना देवासोबत बसवलेत तर ते त्यांनाही हे जग कसे चालते याविषयी सांगतील. राहुल गांधी म्हणाले की, या पदयात्रेच्या निमित्ताने माझ्या डोक्यात नफरत के बाझार मे मोहब्बत की दुकान ही कल्पना माझ्या मनात आली. भारत जोडो ही संकल्पना एकमेकांचा आदर करणे आणि एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही प्रत्यक्षात आणली. एकमेकांबद्दल राग नसावा, अहंकार नसावा यासाठी ती यात्रा होती.
राहुल गांधी यांनी गुरु नानक यांचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी वाचले आहे की, ते मक्केला गेले होते, सौदी अरेबिया, थायलंड, श्रीलंकेलाही गेले होते. खूप आधीच त्यांनी भारत जोडोची संकल्पना प्रत्यक्षात आणली होती. कर्नाटकात बसवण्णाजी, केरळात नारायण गुरुजी असे दिग्गज आहेत. मंगळवारी राहुल गांधी हे अमेरिकेत दाखल झाले. तिथे ते विचारवंत, लेखक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. वॉशिंग्टन डीसी येथेही विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. भारतीय लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सर्वसमावेशक अर्थवृद्धी या विषयांवर ते बोलणार आहेत. त्यानंतर ते न्यूयॉर्कला जाणार आहेत. तिथे ते हार्वर्ड विद्यापीठात विचारवंतांशी संवाद साधणार आहेत. सध्या राहुल गांधी यांना सर्वसाधारण पासपोर्ट देण्यात आला आहे. कारण ते आता खासदार नसल्यामुळे त्या पद्धतीचा राजनैतिक पासपोर्ट त्यांच्याकडे नाही.