१० दिवसांनी अखेर राहुल गांधी दाद मागणार

दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात

१० दिवसांनी अखेर राहुल गांधी दाद मागणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरतच्या दंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आता १० दिवसांनी ते या शिक्षेविरोधात न्याय मागण्यासाठी सत्र न्यायालयात गेले आहेत. सोमवारी सूरत सत्र न्यायालयात ते हजर राहतील, असे म्हटले जात आहे.

२३ मार्च २०२३ला राहुल गांधी यांना सूरत न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषी धरले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. कर्नाटक येथील एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनाव असलेले सगळेच कसे चोर असतात, असे विधान केले होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी हे विधान केले होते. निरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी असे सगळे मोदी आडनाव असलेले लोक चोर कसे काय असतात? या विधानावर गुजरातमधील भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात खटला दाखल केला. संपूर्ण मोदी समाजाची राहुल गांधी यांनी बदनामी केली असा आरोप करत हा खटला दाखल करण्यात आला होता.

दंडाधिकाऱ्यांनी हे आरोप मान्य करत राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला.

हे ही वाचा:

संजय राऊतांना धमकीदेवेंद्र फडणवीसांचा धमाका…

प्रा. सु. ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे कालवश

अमृता फडणवीस खंडणी प्रकरणी ‘बुकी’ अनिल जयसिंघानीचा जामीन नाकारला

सदाबहार, रुबाबदार क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

ही दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी गेली. त्यामुळे ते आता वायनाडचे खासदार नाही. पण १० दिवस राहुल गांधी हे याविरोधात दाद मागण्यासाठी गेले नव्हते. या निकालाविरोधात देशभरात आंदोलने करण्यात आली. राहुल गांधींवर अन्याय झाला अशी ओरड काँग्रेसच्या या आंदोलनातून करण्यात येत होती. दंडाधिकाऱ्यांनी जो निकाल दिला होता तो गुजराती भाषेत होता, त्याचे भाषांतर करण्यासाठी काही वेळ लागेल असे प्रारंभी सांगितले जात होते. त्यामुळे राहुल गांधी यांना या शिक्षेविरोधात दाद मागता आली नाही असे कारण काँग्रेसकडून पुढे करण्यात येत होते. मात्र तरीही त्यासाठी १० दिवस लागले. आता सत्र न्यायालयात अपील केल्यानंतर काय होणार, राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का, जर ती मिळाली नाही तर राहुल गांधी उच्च न्यायालयात दाद मागणार का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत.

Exit mobile version