काँग्रेसने आपल्या ट्विटवर हँडलवर सावरकर समझा क्या, नाम राहुल गांधी है अशा प्रकारचे वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतीत काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी वारंवार अपमानजनक टिप्पणी केलेली आहे. पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या फोटोचा वापर करून सावरकरांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.
त्यावर केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे की, महान क्रांतिकारक सावरकरांबद्दल अशा प्रकारचे विधान करणे योग्य नाही. मी हात जोडून विनंती करतो की, त्यांनी असा अपमान करू नये. एखाद्या महान व्यक्तिमत्त्वाचे महात्म्य तोच सांगू शकतो जो त्यागाचे मूल्य जाणतो.
हे ही वाचा:
बागेश्वर बाबांच्या दरबारात मारला होता ४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ल्ला , ६ जण ताब्यात
ठाकरे गटातील कोणत्या नेत्यांचे श्रीलंका, सिंगापूर आणि लंडनमध्ये हॉटेल्स
पन्हाळगडावर चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात
‘त्या’ विधानाची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक पोहचले राहुल गांधी यांच्या निवासस्थानी
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही यावर टीका केली आहे. ते म्हणतात की, राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन केले आहे. काँग्रेस पक्ष दिवाळखोरीकडे चालला आहे. काँग्रेसकडे कोणतीही विचारधआरा नाही. एका परिवारापलिकडे हा पक्ष कोणताही विचार करू शकत नाही. भाजपा हा एक विचारधारा घेऊन पुढे चाललेला पक्ष आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या विचारावर भाजपा चालला आहे.
कृपया महान आत्मा वीर सावरकर का अपमान न करें। हाथ जोड़कर विनती कर रहा हूं🙏 pic.twitter.com/sjAzRRQ3N5
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 19, 2023
काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रा संपल्यानंतर तिथे करण्यात आलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी म्हटले होते की, काही काश्मिरी महिला आपल्याला भेटल्या आणि त्यांच्यावर सामुहिक अत्याचार झाल्याचे त्यांनी म्हटले होते. हे पोलिसांना सांगायचे का असे विचारल्यावर त्या महिलांनी नकार दिला. त्यामुळे आपल्याला नुकसान सोसावे लागेल, असे या महिलांनी सांगितले त्यामुळे आपण त्याविरोधात पोलिसांकडे गेलो नाही. असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे या महिला कोण अशी विचारणा दिल्ली पोलिसांनी केलेली आहे. रविवारी राहुल गांधी यांच्या घरी दिल्ली पोलिस पोहोचले आणि राहुल गांधी यांना या महिलांबद्दल विचारणा करणारी नोटीस बजावली होती. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारी ही पोस्ट टाकली आहे.