शब्द बदलले पण अर्थ तोच! पुन्हा एकदा शीखांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचे ट्विट

शब्द बदलले पण अर्थ तोच! पुन्हा एकदा शीखांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचे ट्विट

अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना भारतातील शिखांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर ट्विट करत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, मी अमेरिकेत जे बोललो त्यात काय खोटे होते? भाजपाने खोटे पसरवले. मी देशातील आणि परदेशातील प्रत्येक शीख बंधूभगिनींना विचारू इच्छितो की, मी जे म्हणालो त्यात काही चूक आहे का? भारत हा असा देश नाहीए का जिथे शीख किंवा प्रत्येक भारतीय कोणत्याही भयाशिवाय आपापला धर्माचे पालन करू शकतो?

राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी माझ्याबद्दल खोटे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी नेहमीच भारताच्या मूल्यांबद्दल बोलत राहणार आहे. भाजपाकडून मला गप्प करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राहुल गांधी यांनी हे ट्विट करत पुन्हा एकदा आपलेच अमेरिकेतील वक्तव्य वेगळ्या भाषेत मांडले आणि आपण देशहिताचे बोललो असा दावा केला आहे.

हे ही वाचा:

तिरुपती लाडू प्रकरणात ‘अमूल’चे नाव घेतल्याबद्दल तक्रार दाखल

तिरुपती लाडू प्रकरण; जगनमोहन यांचेच हे षडयंत्र!

वक्फच्या अस्तित्वाआधी बांधलेल्या दिल्लीतील मंदिरांच्या जमिनीवरही आता डोळा!

‘विश्वकर्मा योजनेतील कारागीर उद्योजक व्हावेत’

त्यासाठी राहुल गांधी यांनी अमेरिकेतील त्यांच्या भाषणाचा हिस्सा व्हीडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. राहुल गांधी ते भाषण करताना एका शीख व्यक्तीला विचारतात की तुझे नाव काय? तो नाव सांगतो त्यानंतर ते म्हणतात की, एक शीख म्हणून त्याला भारतात पगडी घालण्याची परवानगी मिळेल का? किंवा एक शीख म्हणून त्याला कडे घालण्याची परवानगी मिळेल का? किंवा तो एक शीख म्हणून गुरुद्वारात जाऊ शकेल का? याचाच हा संघर्ष आहे.

राहुल गांधी यांच्या या विधानानंतर भारतात त्यांच्यावर टीका झाली होती. पण आता नव्या रूपात पुन्हा तेच शब्द राहुल गांधी यांनी ट्विट करत आपण खोटे बोललो नव्हतो तर ते वेगळ्या प्रकारे दाखवले गेले असा दावा केला आहे.

 

Exit mobile version