‘राहुल गांधींची पुन्हा मुक्ताफळे’

‘राहुल गांधींची पुन्हा मुक्ताफळे’

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी, “आणीबाणी ही ‘चूक’ होती.” असे वक्तव्य केले आहे. यासोबतच देशाच्या विविध संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा केला आहे, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपाचे सर्व स्तरावरचे सर्व नेते मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. राहूल गांधींनी केरळमध्ये एका ठिकाणी त्यांच्या आजीची ही ‘चूक’ मान्य केली आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ या काळात आणलेली आणीबाणी ही ‘चूक’ होती आणि त्या काळात जे घडले ते “चुकीचे” होते, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी कॉर्नेल विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सांगितले.

हे ही वाचा:

“‘या’ नेत्यांना भाजपात सामील व्हायचे आहे”- अधीर रंजन चौधरी

“आणीबाणीच्या वेळी घटनात्मक हक्क आणि नागरी स्वातंत्र्य निलंबित केले गेले होते, माध्यमांवर कठोरपणे बंदी घातली होती आणि अनेक विरोधी नेत्यांना तुरूंगात डांबले गेले होते.” असेही त्यांनी सांगितले. “आणीबाणीच्या काळात देखील देशाच्या विविध संस्थांवर कब्जा केला गेला नव्हता जो संघाने केला आहे.” असेही ते म्हणाले.

भाजपाच्या अनेक नेत्यांनी यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावर टीका करत, “राहुल गांधींना संघ कळायला बराच वेळ लागेल.” असे वक्तव्य केले आहे.

Exit mobile version