राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू; काँग्रेस कार्यकर्त्यांचे आकांडतांडव

राहुल गांधींची ईडी चौकशी सुरू; काँग्रेस कार्यकर्त्यांचे आकांडतांडव

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोमवार, १३ जून रोजी म्हणजेच आज चौकशी आहे. त्यामुळे राहुल गांधी हे ईडी कार्यलयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत प्रियांका गांधी ह्या देखील आहेत. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून, ते निदर्शने करत आहेत. मात्र, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोर्चा करण्यास पोलिसांची परवानगी नसतानाही कार्यकर्ते मोठ्या संख्यने जमले आहेत. त्यामुळे पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात गेहण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स पाठवले होते. मात्र, त्यावेळी राहुल गांधी हे परदेशी दौऱ्यावर होते. त्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितली होती. त्यांनतर ईडीने राहुल गांधींना दुसरे समन्स पाठवून, १३ जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज राहुल गांधी हे चौकशीसाठी हजर झाले आहेत. मात्र पोलिसांची परवानगी नसतानाही, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जमावाने जमून आंदोलन करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

लष्कर-ए-तोयबाच्या आदिल पर्रेसह २४ तासांत पाच दहशतवादी ठार

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात स्फोट; एकाला घेतलं ताब्यात

मूसेवाला हत्येप्रकरणी संतोष जाधवच्या आवळल्या मुसक्या

मुलांवर आंदोलनांचे हे कसले ‘संस्कार’

राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये देखील मोर्चा कॉंग्रेसने मोर्चा काढला आहे. दरम्यान, सोनिया गांधी ह्या सध्या गंगाराम रुग्णालयात आहेत. ईडीचे समन्स अलायनानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या समस्येमुळेच त्या सध्या रुग्णालयात आहेत.

Exit mobile version