राहुल गांधी हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या ते विविध ठिकाणी निवडणुकांच्या निमित्ताने प्रचारसभा घेत आहेत. मध्य प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी मोठ्या उद्योगपतींमुळे आपल्याला रोजगार मिळत नाहीत तर छोट्या उद्योग, व्यवसायातून रोजगार मिळतात, असे उद्गार काढून सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे.
रोजगार बड़े उद्योगपति नहीं देते, रोजगार छोटे व्यापारी देते हैं।
पहले हिन्दुस्तान में लाखों छोटे-छोटे यूनिट हुआ करते थे, जिससे लाखों युवाओं को रोजगार मिलता था।
नरेंद्र मोदी जी ने छोटे व्यापारियों पर नोटबंदी और GST लगाकर आक्रमण करना शुरु कर दिया।
GST टैक्स नहीं है, यह छोटे… pic.twitter.com/RcRrhupfEZ
— Congress (@INCIndia) November 10, 2023
राहुल गांधी या सभेत म्हणाले की, रोजगार मोठे उद्योगपती देत नाहीत तर रोजगार छोटे व्यापारी, व्यावसायिक देतात. ते छोटे, मध्यम स्वरूपाचे उद्योग चालवतात. अनेक उत्पादने घेतात. दुकाने चालवतात ते रोजगार देतात. अशा हिंदुस्थानात यापूर्वी लाखो युनिट होते. कुणी लोखंडाचे काम करत होते, कुणी गाड्य़ांचे छोटे सुटे भाग बनवत असत. यातून रोजगार मिळत असे. नरेंद्र मोदी आले, भाजपाची सरकारे आली आणि त्यांनी या युनिटवर आक्रमणे सुरू केली. ही आक्रमणे कशी केली तर नोटबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून. जीएसटी हा टॅक्स नाही तर शेतकऱी, छोटे व्यापारी, मध्यम आणि छोट्या व्यापाऱ्यांवर आक्रमण आहे. या व्यापाऱ्यांना संपवण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार आले. प्रथमच शेतकरी टॅक्स देत आहे. १२ टक्के ट्रॅक्टरवर, १८ टक्के कीटकनाशकांवर, ५ टक्के खतांवर टॅक्स देत आहे. जो शेतकरी देशाचा कणा आहे तो टॅक्स देत आहे. संपूर्ण देश जीएसटीच्या माध्यमातून पैसे देत आहे.
Only Priyanka can give tough competition to Pappu in comedy😂😂
— Rishi Bagree (@rishibagree) November 9, 2023
अशाप्रकारचे वक्तव्य राहुल गांधी यांच्या भगिनी आणि काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी यांनी केले आहे. त्यामुळे दोघांचीही मोठ्या उद्योगपतींबद्दल एकच भूमिका असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा:
हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन मुंजाल यांच्या मालमत्तेवर टाच!
पाकिस्तानात दहशतवाद्याला ठोकले
‘भिवंडीतील पडघा हे गाव सीरियासारखे! शरियाचे होते पालन…’
प्रियांका गांधी म्हणाल्या की, एका जमान्यात टाटा बिर्ला हे मोठे उद्योगपती होते, आजही आहेत. पण आपल्याला माहीत होते की, टाटा हे ट्रक तयार करतात. गाडी बनवतात. आपण दुकानात जातो तेव्हा भांडी कोण बनवतं, कपडे कोण बनवतं हे आपल्याला माहीत होतं. ही आपल्या सुविधेसाठी असलेली कामे आहेत. आता अंबानी, अदानी लोकांसाठी काय बनवतात. किती रोजगार देतात, किती कामगार त्यांच्याकडे काम करतो हे माहीत आहे का, तुम्ही सांगू शकत नाहीत.
प्रियांका म्हणाल्या की, हे मोठे उद्योगपती काही बनवत नाहीत तर तुमचे जे आहे ते हे लोक हिसकावून घेत आहेत. आपल्यासाठी काहीही बनवले जात नाही.