आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या दुटप्पीपणावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे. बँकांच्या खासगीकरणा संदर्भात रघुराम राजन यांनी युपीए सरकारच्या काळात केलेली विधाने आणि मोदी सरकारच्या काळात केलेली विधाने यातील फरक दाखवत अतुल भातखळकरांनी टीकास्त्र सोडलं.
यूपीए सरकारच्या काळात ठराविक सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याची भलामण करणारे रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर अर्थतज्ञ रघुराम राजन हे आज मोदी सरकारने त्याच दिशेने पाऊल उचलताच ही हिमालयाएवढे चूक असल्याचे सांगतात… राजन यांच्या बुद्धीचा मोदी द्वेषाने ताबा घेतलाय. pic.twitter.com/MJfpLE4abL
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 17, 2021
रघुराम राजन हे सप्टेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१६ या काळात आरबीआयचे गव्हर्नर होते. राजन यांनी युपीए सरकारच्या काळात बँकांच्या खासगीकरणाचा पुरस्कार केला होता. बँकांच्या खासगीकरणाचे फायदे देखील अनेक वेळा सांगितले होते. बँकांच्या खासगीकरणामुळे बाजारात चलन तुटवडा होत नाही. तसेच बँकांचे एनपीएसुद्धा कमी राहतात. सरकारला बँका बुडण्यापासून वाचवण्यासाठी वारंवार पैसा टाकावा लागत नाही, म्हणजेच बँकांचे रिकपिटलायझेशन करावे लागत नाही. अशा पद्धतीने त्यांनी बँकांच्या खासगीकरणाचे फायदे सांगितले होते. युपीए सरकारच्या काळात जेंव्हा सरकारने खासगीकरणाचा प्रयत्न केला होता तेंव्हा राजन विविध परिषदांमधून या प्रयत्नांना बळ देण्यासाठी प्रयत्न करत होते.
हे ही वाचा:
बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन
भाजपाच्या ‘या’ खासदाराची आत्महत्या?
मात्र आता मोदी सरकारने बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्यावर हा निर्णय चुकीचा असल्याचेही हेच रघुराम राजन सांगत आहेत. याच राजन यांच्या दुटप्पीपणावर अतुल भातखळकरांनी ट्विट केले आहे. “यूपीए सरकारच्या काळात ठराविक सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याची भलामण करणारे रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर अर्थतज्ञ रघुराम राजन हे आज मोदी सरकारने त्याच दिशेने पाऊल उचलताच ही हिमालयाएवढी चूक असल्याचे सांगतात. राजन यांच्या बुद्धीचा मोदी द्वेषाने ताबा घेतलाय.” असे ट्विट अतुल भातखाळकरांनी केले आहे.