बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी रघुनाथ कुचिकचा पीडितेवर दबाव

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी रघुनाथ कुचिकचा पीडितेवर दबाव

बलात्काराचे आरोप झालेला शिवसेना नेता रघुनाथ कुचीक याच्यावर आता नवे आरोप होताना दिसत आहेत. रघुनाथ कुचिक याच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने कुचिक आपल्यावर दबाव आणत असल्याचा नवा आरोप केला आहे. बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी हा दबाव आणला जात आहे असा या तरुणीचा दावा आहे.

शिवसेना नेता रघुनाथ कुचिक याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी एका तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. पण आता या प्रकरणात कुचिक याच्या विरोधात नवे आरोप झाले आहेत. कुचिक याने आपल्या विरोधातील गुन्हा मागे घ्यावा यासाठी तरुणीला धमकी दिली आहे.

हे ही वाचा:

भाजपाच्या पोल खोलमुळे दहिसरमध्ये शिवसेना बिथरली

कुतुबमिनारजवळच्या मशिदीसाठी उद्ध्वस्त केली होती २७ मंदिरे

दिल्लीत मास्कसक्ती, मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड

कुमार विश्वास यांच्या घरी पोहचले पोलीस; ट्विट करत मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

तरुणीने गुन्हा मागे न घेतल्यास शरीर संबंधांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी कुचिकने दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या सोबतच बंदुकीचा धाक दाखवत समजुतीच्या करारावर सह्या घेतल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आता रघुनाथ कुचिकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तर या वरून भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली दिसत आहे भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “आता रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वातील महिला आयोग झोपलाय का? रघुनाथ कुचिकवर कारवाईचे आदेश का देत नाही?

बलात्कारासारखे गंभीर आरोप असणारा कुचिक, पिडीतेवर दबाव आणतोय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सरकार आणि महिला आयोग तमाशा बघतायंत.” असा हल्लाबोल भाजपाने केला आहे.”

Exit mobile version