‘त्या’ बेपत्ता पीडीतेला इंजेक्शन देऊन गोव्याला नेलं

‘त्या’ बेपत्ता पीडीतेला इंजेक्शन देऊन गोव्याला नेलं

काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही पीडिता गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला होता. या पिडीतेबद्दल आता त्यांनी नवं ट्विट करत माहिती दिली आहे.

चित्रा वाघ यांनी त्यांचा एक व्हिडीओ ट्विट करत म्हटले आहे की, शिवसेना नेता रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. काल रात्री तिचा फोन मला आला होता. तेव्हा तिला मदतीची आवश्यकता असल्याचे तिने म्हटले. तेव्हा आजूबाजूच्या घरांमधल्या व्यक्तींशी बोलणं करून देण्यास सांगितल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. त्यानुसार स्थानिक व्यक्तीशी बोलल्यावर ती तरुणी गोव्याच्या मनमाडमधील कोलवा गावात असल्याचे समजले.

हे ही वाचा:

‘शिवसेनाप्रमुखांची नव्हे सोनिया मॅडम आणि जाणत्या पवारांच्या रिमोटवर चालणारी शिवसेना’

मुंबई पोलिसांनी पारदर्शक भूमिका घेतली असती तर…

आसाम मधील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी अर्ध्या दिवसांची सुट्टी

होळीच्या निमित्ताने ठाकरे सरकारची नवी नियमावली

तरुणीने सांगितलेल्या माहितीनुसार तिला इंजेक्शन देऊन काही व्यक्तींनी नेलं होतं. या व्यक्तींमध्ये पोलिसही होते. तिच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या देखील घेण्यात आल्याची माहिती तरुणीने चित्रा वाघ यांना दिली आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांना सविस्तर माहिती दिल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. “या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका. मुख्यमंत्री महोदय आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कुचिकवर तात्काळ ३०७ चा गुन्हा दाखल करा. तिच्या मरणाची वाट बघू नका, त्याआधी तिला वाचवा,” अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

Exit mobile version