उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर एकत्र येऊन काय उपयोग, कारण भीमशक्ती आमच्या पाठीशी

रामदास आठवले यांनी दिला इशारा

उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर एकत्र येऊन काय उपयोग, कारण भीमशक्ती आमच्या पाठीशी

The Minister of State for Social Justice & Empowerment, Shri Ramdas Athawale addressing a press conference, in New Delhi on November 24, 2017.

सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे आणि आंबेडकर एकत्र आले तरी जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद होतील. युती तुटायला वेळ लागणार नाही, असा इशारा आठवले यांनी दिला आहे.

सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की , खासदार संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही. राज्य सरकार खंबीर आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार २०२४ पर्यन्त कार्यकाळ पूर्ण करून २०२४ ला परत आमची सत्ता येणार आहे. खासदार संजय राऊत म्हणतात तस सत्तांतर होणार नाही. राज्य सरकार खंबीर आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार २०२४ पर्यन्त कार्यकाळ पूर्ण करून २०२४ ला परत आमची सत्ता येणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी फरक पडणार नाही कारण भीमशक्ती आमच्या पाठीशी आहे.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

संजय राऊत म्हणतात तसे सरकार अस्थिर नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३५० खासदार आणि एनडीएचे ४५० खासदार निवडून येणार आहेत. राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत. त्यांची भारत जोडो यात्रा भारताचे तुकडे करणार असून काँग्रेसने आधी जोडो यात्रा करावी असा टोलाही आठवले यांनी यावेळी लगावला.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ५ आणि ६ मे रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अधिवेशनाचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले आहे. ६ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

Exit mobile version