‘छळामुळे’ काँग्रेस सोडलेल्या राधिका खेरा यांच्या हाती ‘कमळ’

अभिनेते शेखर सुमन यांचाही भाजपात प्रवेश

‘छळामुळे’ काँग्रेस सोडलेल्या राधिका खेरा यांच्या हाती ‘कमळ’

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधून राजीनामा देणाऱ्या राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन या दोघांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.राधिका खेडा आणि अभिनेते शेखर सुमन यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे.

काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या राधिका खेडा यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.राधिका खेडा यांनी छत्तीसगडमध्ये आपल्यावर गैरवर्तन आणि कट रचल्याचा आरोप केला होता. अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.त्यांच्यासोबत अभिनेते शेखर सुमन यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.दिल्लीतील भाजप मुख्यालयात विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या दोघांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

हे ही वाचा:

मी यापूर्वी कधी बोललो नाही, पण मुस्लिम समाजाने आता आत्मपरिक्षण करायला हवे!

‘निलेश मेहता’ बनला ‘बिजल मेहता’, लिंग शस्त्रक्रियेनंतर महिला म्हणून कामावर रुजू!

झारखंड रोकड जप्ती प्रकरणी मंत्र्यांच्या पीएसहित नोकरास अटक!

पालघर: खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश!

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या माजी नेत्या राधिका खेडा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या की, आजची काँग्रेस महात्मा गांधींची काँग्रेस नाही, ती रामविरोधी, हिंदूविरोधी काँग्रेस आहे.मी प्रभू राम भक्त आहे, प्रभू रामांच्या दर्शनासाठी मी अयोध्येला गेले होते, त्यानंतर काँग्रेस पक्ष माझा तिरस्कार करू लागला.निवडणुकीच्या काळात तुम्ही अयोध्येला का गेलात असा मला प्रश्न नेहमी विचारले जायचे ,असे राधिका खेडा यांनी सांगितले.

तसेच अभिनेते शेखर सुमन यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.ते म्हणाले की, कालपर्यंत मलाही माहित न्हवते की मी आज या ठिकाणी बसेन.मी एका सकारात्मक विचारसरणी घेऊन या ठिकाणी आलो आहे.मी पहिला देवाचे आभार मानेन, कारण मला या ठिकाणी येण्याचा त्यांनी आदेश दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विनोद तावडे अन्य पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो.

Exit mobile version