पश्चिम बंगालमधील बलात्कार प्रकरणामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्यथित!

निर्भया कांड नंतर १ २ वर्ष समाज बलात्काराच्या घटनांना विसरला आहे.

पश्चिम बंगालमधील बलात्कार प्रकरणामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्यथित!

R.G. Tax malpractice case: President Draupadi Murmu's reaction!

आर.जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेला दुष्कृत्य आणि निर्घृण खुनाच्या प्रकरणामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोलकाता पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक सरकारचा मनमानी कारभार देशासमोर उघडा केला होता. या प्रकरणावर आता देशाच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी घटनेवर हळहळ व्यक्त करत आपले विचार मांडले आहेत.

आर. जी. कर मेडिकल कॉलेजमधील रेसिडेंट डॉक्टरवर बलात्काराला कथित काही टोळक्यांनी वेगळे वळण देण्याचा घाट घातला होता , जो रेसिडेंट डॉक्टरांच्या निदर्शनाने हाणून पडला. निदर्शने करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी आणि रेसिडेंट डॉक्टरांवर मोठ्या संख्येने सुनियोजित हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाने काही दिवसांतच राष्ट्रव्यापी आंदोलनही उभे केले होते. परिणामस्वरुप या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुओ मोटो केस घेतली आणि आता पश्चिम बंगालमध्ये निदर्शनांवर प्रादेशिक सरकारची टाच प्रकरणाला राष्ट्रपतींच्या नजरेआड करू शकलेली नाही.

 हे ही वाचा:

सोनिया-राजीव विवाह हे आयएसआयचे षडयंत्र? आरोपांपेक्षा काँग्रेसचे मौन अधिक गूढ

देशभरात १२ औद्योगिक स्मार्ट शहरे उभारणार

जे जे रुग्णालयात अँटीमायक्रोबायोल इमर्जन्सी रूमचे उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रेस ट्रस्ट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कोलकाता मधील प्रकरणावर हळहळ व्यक्त केली आहे, त्या म्हणाल्या, जे लोक अश्या पद्धतीचे विचार ठेवतात ते महिलांना केवळ साधन म्हणून पाहतात. आपल्या मुलींच्या जीवनातील भयापासून सुटकेच्या वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे. निर्भया कांड नंतर १ २ वर्ष समाज बलात्काराच्या घटनांना विसरला आहे. राष्ट्रपती आव्हानात्मक भूमिका घेत म्हणाल्या, “पुरे झाले. मी निराश आणि घाबरलेली आहे. यापुढे मुलींवर होणारे गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत. आत्तापर्यंत खूप काही घडले आहे. समाजाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. समाजाला प्रामाणिक आणि निष्पक्ष आत्मचिंतन आवश्यक आहे. ”

महिलांच्या शोषणावर प्रतिक्रिया देत त्या म्हणाल्या, “एक सुसंस्कृत समाज महिला आणि मुलींवरील अत्याचार कधीच सहन करू शकत नाही. या घटनेनंतर कोलकात्यात विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिकांनी निदर्शने केली, तर आरोपी बाहेर फिरत होते. त्यामुळे समाजाला प्रामाणिक आणि आत्मनिरीक्षक होण्याची नितांत गरज आहे.”

 हे ही वाचा:

आरजी कार कॉलेजच्या माजी प्राचार्यांचे इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सदस्यत्व रद्द

स्वप्नील कुसाळे म्हणतो, हिंदू संस्कृती जपली की हिंदू राष्ट्र मोठे होईल!

भाजपच्या भरत राजपूत यांना नालासोपाऱ्यात प्रतिसाद

Exit mobile version