ॲड. प्रदिप गावडेंवर ठाकरे सरकारची ‘तत्पर’ कारवाई

ॲड. प्रदिप गावडेंवर ठाकरे सरकारची ‘तत्पर’ कारवाई

भारतीय जनता पार्टीचे पदाधीकारी ॲड. प्रदिप गावडे यांना मुंबई पोलीसांनी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे गावडे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींवर खालच्या पातळीची टीका करण्यासाठी गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसताना गावडे यांना मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांकडून उचलण्यात आले आहे.

एकीकडे सारा देश कोविडमध्ये होरपळून निघत असताना समाज माध्यमांवर मात्र रोज राजकीय आखाडा रंगलेला पाहायला मिळतो. विविध विषयांवरून राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसतात. पण कधी कधी हा वाद विकोपाला जाऊन प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत जाते.

अशाच एका प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्यामुळे ॲड.प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी उचलले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच प्रदीप गावडे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या ५४ जणांविरोधात तक्रार केली होती. पण त्या तक्रारीवर पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. पण गावडे यांना मात्र ‘तत्परतेने’ ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा

ठाकरे सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय?

पांडू हवालदार फेम, जेष्ठ संगीतकार विजय पाटील यांचे निधन

आंध्रातील नेल्लोरमध्ये कोरोनावर आयुर्वेदिक औषध?

तर गावडे यांच्या अटकेवरून महाराष्ट्राचे राजकारण तापताना दिसत आहे. भाजपा आमदार राम सातपुते यांनी प्रदीप गावडे यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असून गावडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याला ठाकरे सरकार जबाबदार असेल असा घणाघात केला आहे.

Exit mobile version