संरक्षण करारासाठी पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

संरक्षण करारासाठी पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे आजपासून दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान भारत- पाकिस्तान संबंध, भारत- चीन संबंध, अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि या सर्व परिस्थितीमध्ये रशियाची भूमिका यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यात काही संरक्षण करारावर (डिफेन्स डिल) स्वाक्षऱ्या होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होईल तसेच मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा अपेक्षीत आहे.

रशियाने अत्याधुनिक एके- २०३ असॉल्ट रायफलची निर्मिती केलेली आहे. भारत आणि रशिया यांच्यात याच रायफल्सचा करार होणार असून या रायफल्सची निर्मिती उत्तर प्रदेशातमधील अमेठी येथे ‘मेक इन इंडिया’ मिशन अंतर्गत होणार आहे. करार झाल्यानंतर पुढच्या दहा वर्षासाठी भारतीय सशस्त्र दलांसाठी एके- २०३ मॉडेलची ६ लाख १४ हजार ४२७ रायफल्सची निर्मिती केली जाणार आहे. यातील पहिल्या ७० हजार रायफल्स ह्या रशियातच तयार होऊन निर्मितीच्या सगळ्या अटी पूर्ण केल्यानंतर तिचे भारतात उत्पादन सुरु होईल. त्यासाठी ३२ महिन्यांचा कालावधी ठरवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पाठीवर बॅग आहे?? ​मग काळजी घ्या…वाचा सविस्तर!

…आणि डॉलरऐवजी त्याला मिळाले कागदाचे तुकडे !

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले

शिवमंदिर हटविल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी

भारताला चीनकडून असलेला धोका लक्षात घेता तसेच चीनच्या कुरापती लक्षात घेता आणि संरक्षणाच्या दृष्टीने भारताने रशियाकडून एस- ४०० ही मिसाईल डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याचा निश्चय केला असून त्यावर आज शिक्कामोर्तब होईल. कुठल्याही क्षमतेचे मिसाईल हाणून पाडण्याची क्षमता ह्या डिफेन्स सिस्टीममध्ये असून ही सिस्टीम एवढी शक्तिशाली मानली जातेय की, त्यावर अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. काही निर्बंध लादण्याचीही अप्रत्यक्ष घोषणा केली आहे. मात्र, भारताने असे कुठलेही इशारे सहन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

२०१९ मध्ये ब्रासिलियामध्ये मोदी आणि पुतीन यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटीची आणि चर्चेची ही पहिलीच वेळ आहे. पुतीन यांचा कोरोना काळानंतरचा हा पहिला विदेश दौरा आहे. भारत- रशिया या दोन देशांमधील हे २१वे शिखर संमेलन आहे. दोन्ही देशांचे शिष्टमंडळ चर्चेत सहभाग घेतील. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे भारताकडून भाग घेतील तर, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव रशियाचे प्रतिनिधित्व करतील.

Exit mobile version