23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणराज ठाकरेंना तुरुंगात टाका, अबू आझमींची शरद पवारांकडे मागणी

राज ठाकरेंना तुरुंगात टाका, अबू आझमींची शरद पवारांकडे मागणी

Google News Follow

Related

गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत तसेच मंदिरात हनुमान चालीसा लावण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली होती. त्यात आता समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेत राज ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांना बेड्या ठोका आणि तुरुंगात टाका, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केल्याचे अबू आझमी यांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांचे सध्या स्वतःचे असे काही अस्तित्वच राहिलेले नाही. ज्यांच्याकडे कोणतीही जागा नाही असे लोक आपली मनमानी करत आहेत. देशात मशीदींना परवानगी मिळाली आहे. या देशाच्या कायद्यानुसार हिंदु बांधव मंदिरात पूजा करु शकतात, मुस्लिम बांधव नमाज पठण करु शकतात. दोन्ही धर्माचे लोक प्रेमाने राहतात. असा कायदा देशात असताना राज ठाकरे काहीही बरळतात. त्यामुळे राज ठाकरेंसारख्या लोकांच्या हातात बेड्या ठोकून त्यांना जेलमध्ये टाकावे, असे अबू आझमी म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक

‘ठाकरे सरकारच्या डर्टी डझनवर कारवाई होणारच’

इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार

मुद्रा योजनेची सात वर्ष! १८.६० कोटी रुपयांची कर्ज वितरित

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी,” मशिदीवरील भोंगे जर काढले नाहीत तर आम्ही लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू, असे आव्हान ठाकरे यांनी दिले होते. त्यांनतर दुसऱ्या दिवशीपासूनच मुंबई, नाशिक, कल्याण आणि डोबिंवलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा