आज केंद्रीय मंत्री नारायण राणे जन-आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवसेनेच्या सैनिकांनी त्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लक्ष्य करत ट्वीट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्रातील चार खासदारांची मंत्रीमंडळात वर्णी लागली होती. या सर्व मंत्र्यांच्या जन-आशीर्वाद यात्रेला राज्यात सुरूवात झाली आहे. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांच्या जन-आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत आले होते. त्यांनी शिवाजी पार्कला जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या स्मृतीस्थळाचे गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण केले.
हे ही वाचा:
महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे
पाकिस्तानला तालिबान प्रेमाची उचकी
त्यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेचेच शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसवर टीका केली त्यांच्यासोबत सत्ता प्रस्थापित केली यावरून देखील त्यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. ते ट्वीटमध्ये म्हणतात,
शिवसेनाप्रमुखांना राहुल गांधी आदरांजली वाहत नाहीत, तरी त्यांच्या मांडीवर बसता. शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या लखोबाच्या गळ्यात गळे घालता. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर ज्यांचा उद्धार केला त्या सोनिया मातोश्रींना मुजरे करता… उद्धवजी शुद्धीकरण खरेतर शिवसेनेचे करण्याची गरज आहे.
शिवसेनाप्रमुखांना राहुल गांधी आदरांजली वाहत नाहीत, तरी त्यांच्या मांडीवर बसता. शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या लखोबाच्या गळ्यात गळे घालता. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर ज्यांचा उद्धार केला त्या सोनिया मातोश्रींना मुजरे करता…
उद्धवजी शुद्धीकरण खरेतर शिवसेनेचे करण्याची गरज आहे. pic.twitter.com/a6psCGvfht— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 19, 2021
खासदार नारायण राणे यांची जन-आशीर्वाद यात्रा आजपासून सुरू झाली आहे. ते या यात्रेसाठी पुढे कोकणात जाणार आहेत.