25 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरराजकारणदीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंविषयी बोलू नये

दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंविषयी बोलू नये

Google News Follow

Related

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. या वादात दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरु असताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले आहे. दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरे यांच्याविषयी बोलू नये. त्यांची तेवढी लायकीही नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

संदीप देशपांडे शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर आगपाखड केली. राष्ट्रवादी नाव असणारा पक्ष महाराष्ट्रात अतिश्य संकुचित आणि जातीपातीचं राजकारण करत आहे. मनसेला त्यांच्याकडून शिकायची गरज नाही. राज्यात जातीपातीचं विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रद्रोही असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या दिशेने होता.

राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला होता.

हे ही वाचा:

बैल गेला नि झोपा केला

भारताने बनवली जगातील पहिली डीएनए लस

पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन

लोकप्रतिनिधींच्या दबावाला कंटाळून तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा! ऑडिओ क्लिप व्हायरल

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण ९९ साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण ९९ नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा