कुमार विश्वास यांच्या घरी पोहचले पोलीस; ट्विट करत मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

कुमार विश्वास यांच्या घरी पोहचले पोलीस; ट्विट करत मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

आम आदमी पक्षाचे (आप) माजी नेते आणि सुप्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या घरात आज, २० एप्रिल रोजी पंजाब पोलीस दाखल झाले आहेत. कुमार विश्वास यांच्या वसुंधरा येथील निवासस्थानी पोलीस पोहोचले असून पोलीस का आले आहेत याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या प्रकाराची माहिती स्वतः कुमार विश्वास यांनी ट्विट करून दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये कुमार विश्वास यांनी म्हटले आहे की, “पहाटे पंजाब पोलीस घरी आले आहेत. माझ्यामार्फत पक्षात सामील झालेल्या भगवंत मान यांना मी इशार देत आहे की, दिल्लीत बसलेल्यांना तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या ताकदीशी खेळू देत आहात. हीच व्यक्ती एक दिवस तुम्हाला आणि पंजाबलाही फसवेल. माझा हा इशारा देशाने लक्षात ठेवावा,” असे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

प्रसिद्ध अभिनेते, अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांच्या दोन पुस्तकांचे शुक्रवारी प्रकाशन

नागालँडमधील फुटीरतावादी संघटनां सोबतच्या युद्धविराम कराराला मुदतवाढ

भारताची भूमिका कौतुकास्पद; रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांनी केले कौतुक

न्यायव्यवस्थेवर केलेली टीका संजय राऊतांना भोवणार

पंजाब निवडणुकीदरम्यान कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल आणि पक्षाविरोधात अनेक विधाने केली होती आणि त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ झाली होती. त्यांच्या एका वक्तव्याबाबत पोलीस त्यांच्या निवासस्थानी गेले असावेत, अशी चर्चा आहे. कुमार विश्वास यांनी निवडणुकीपूर्वी आपल्या एका वक्तव्यात म्हटले होते की, अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही प्रकारे पंजाबचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. पंजाबचे मुख्यमंत्री पद न मिळाल्यास खलिस्तानचा मुख्यमंत्री होईन, असेही ते म्हणाले होते.

Exit mobile version