पोलिसांनीच सांगितला पंतप्रधानांच्या प्रवासाचा मार्ग

पोलिसांनीच सांगितला पंतप्रधानांच्या प्रवासाचा मार्ग

पंजाब मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडविण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. या घटनेमुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पण अशातच आता या संपूर्ण प्रकरणात एक नवा धक्कादायक खुलासा पुढे आला आहे. पंतप्रधानांच्या प्रवासाचा मार्ग पोलिसांनीच आम्हाला सांगितल्याचा दावा एका आंदोलकाने केला आहे. या धक्कादायक खुलास्यानंतर या संपूर्ण प्रकरणातील पोलिसांची भूमिका नेमकी काय होती? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

बुधवार, ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाब दौरा नियोजित होता. हुस्सैनिवला येथील शहीद स्मारकाला अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान मोदी जाणार होते. हा दौरा हेलिकॉप्टरने नियोजकत केला असला तरी देखील खराब हवामानामुळे पंतप्रधानांना रस्ते मार्गाने प्रयाण करावे लागले. पण या प्रवासात पंतप्रधानांचा ताफा कथीत किसान आंदोलकांनी अडवला. अशावेळी तब्बल २० ते २५ मिनिटे पंतप्रधानांचा ताफा अडवून धरण्यात आला. भारतीय किसान युनियन या संघटनेच्या आंदोलकांनी पंतप्रधान जाणार असलेला फ्लायओव्हर अडवून ठेवला.

हे ही वाचा:

वृद्ध महिलेला लुटणारी टोळी २४ तासांत जेरबंद

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबणीवर

तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा… मोदींची खोचक टीका

‘यमा’लाही मिळाली ‘माय’

या प्रकरणानंतर पंजाब सरकार आणि प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू असून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आंदोलकांना पंतप्रधान कोणत्या मार्गाने जाणार आहेत हे कळले कसे? तर या आंदोलकांना हटवण्यात का आले नाही? असे अनेक सवाल विचारले जात आहे.

अशातच ‘पोलिसांकडूनच आम्हाला पंतप्रधान कोणत्या रस्त्याने जाणार आहे तो मार्ग समजला’ असा दावा एका आंदोलकाने माध्यमांशी बोलताना केला आहे. या दाव्यात जर तथ्य असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली अडवणूक ही सुनियोजित होती का? आणि त्याला पंजाब सरकारचा आणि पंजाब प्रशासनाचा पाठिंबा होता का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Exit mobile version