निवडणूक आयोगाने पंजाब विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही निवडणूक १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात होणार होती. मात्र सर्व पक्षांच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने आता सहा दिवस नंतर म्हणजेच २० फेब्रुवारीला मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तत्पूर्वी, जवळपास सर्वच पक्षांनी निवडणूक आयोगाला पंजाबमधील सर्व ११७ विधानसभा जागांवर एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान काही दिवस पुढे ढकलण्यास सांगितले होते. १६ फेब्रुवारीला रविदास यांची जयंती आहे. आणि संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील दलित समाजातील अनेक लोक वाराणसीला जाणार असल्याचे पक्षांनी सांगितले. काँग्रेसशिवाय भाजपनेही निवडणूक आयोगाला मतदान पुढे ढकलण्याची विनंती केली होती, त्यावर आयोगाने सोमवारी निर्णय घेतला.
हे ही वाचा:
सौंदर्य स्पर्धेत भारतीय स्पर्धकाच्या ‘साप’नीतीला मिळाला सर्वोत्तम किताब
‘मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’
‘इच्छेविरुद्ध लसीकरण करण्यास भाग पाडता येणार नाही’
ब्रिटनमधील शीख धर्मियांनी का दिला मोदींना पाठिंबा?
यापूर्वी काँग्रेस, भाजप, बसपा यांनी निवडणूक आयोगाला मतदान पुढे ढकलण्याची विनंती केली होती, त्यावर आयोगाने सोमवारी निर्णय घेतला. आता पंजाब विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात २० फेब्रुवारीला होणार आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेतला. सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्रे लिहिली होती. बहुजन समाज पक्षानेही ही मागणी लावून धरली होती.
भाजपने आपल्या पत्रात म्हटले आहे की, १६ फेब्रुवारीला गुरु रविदासजींची जयंती असल्याने संबंधित समाजाचे लोक यावेळी वाराणसीला जाणार आहेत. त्यामुळे लाखो लोकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. राज्यातील सुमारे ३२ टक्के लोक अनुसूचित जातीतील आहेत. गुरु जयंतीनिमित्त वाराणसीला मोठ्या संख्येने भेट देणाऱ्या लोकांना तेथून परतायला त्यांना वेळ लागू शकतो. त्यामुळे ते मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यामुळे मतदानाची तारीख वाढवावी.