मुख्यमंत्री भगवंत मान बनणार ‘दुल्हेराजा’

मुख्यमंत्री भगवंत मान बनणार ‘दुल्हेराजा’

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा लग्न करणार आहेत. ते गुरुवार,७ जुलै रोजी चंदीगडमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विवाह सोहळा साधेपणाने होणार आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ज्या मुलीसोबत लग्न करणार आहेत, तिचे नाव डॉ. गुरप्रीत कौर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लग्नाबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मान यांच्या निवासस्थानी हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. सात वर्षांपूर्वी त्यांचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला आहे. मान यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आणि एक मुलगा आहे. दोघेही आईसोबत परदेशात राहतात. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा ते दोघेही आपल्या वडिलांना भेटण्यासाठी शपथविधीला आले होते. २०१४ मध्ये भगवंत मान यांनी संगरूरमधून लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांची पहिली पत्नी इंद्रप्रीत कौर त्यांचा प्रचार करताना दिसल्या होत्या . मात्र त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला आहे.

हे ही वाचा:

नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक

‘नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे’

वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!

ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा

नवीन होणाऱ्या त्यांच्या पत्नी ह्या पेशाने डॉक्टर आहेत. भगवंत मान यांच्या लग्नाच्या तयारीची जबाबदारी आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राघव चढ्ढा यांच्यावर आहे. राघव चढ्ढा या लग्नाची पूर्ण तयारी करत आहेत.

Exit mobile version