काही वर्षांपूर्वी भारतात शेतकरी आंदोलनाने जोर पकडला होता. तेव्हा याच शेतकऱ्यांच्या आंदोलनांना पाठिंबा देणारे आम आदमी पार्टीचे नेते आता पंजाबमध्ये सत्तेत असताना मात्र याच शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवत आहेत.त्यामुळे पंजाबमध्ये तणाव वाढत आहे. सत्ताधारी आम आदमी पक्ष (AAP) सरकार आणि शेतकरी संघटना ‘चंदीगड चलो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमने-सामने आले आहेत. हे आंदोलन संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने 5 मार्चला आयोजित केलं आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान SKM च्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर शेतकरी नेत्यांनी मंगळवारी सांगितलं की, राज्य पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून अनेक आंदोलकांना अटक केली. SKM ही 37 शेतकरी संघटनांचं छत्र संघटन आहे.
याबाबत भगवंत मान म्हणाले की, या घटनेची पुष्टी करताना मान म्हणाले की, ते किसान मोर्चाच्या बैठकीतून बाहेर पडले, ज्यावेळी शेतकरी नेत्यांनी ५ मार्चपासून आंदोलन सुरू ठेवण्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, “होय, मी बैठक सोडली. आम्ही शेतकऱ्यांना रेल्वे रुळांवर, रस्त्यांवर बसू देणार नाही.” मान यांनी शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
ते म्हणाले, दररोज तुम्ही ‘रेल रोको’, ‘सडक रोको’ आंदोलन करता… यामुळे पंजाबला प्रचंड तोटा सहन करावा लागतोय. राज्य आर्थिक तोट्यात आहे. पंजाब ‘धरना’ राज्य बनत आहे. माझ्या मृदू स्वभावाचा गैरफायदा घेऊ नका. मी कारवाई करणार नाही, असा समज करून घेऊ नका. मान यांनी स्पष्ट केलं की, बैठक आणि ‘मोर्चा’ हे एकत्रित होऊ शकत नाहीत. ते म्हणाले, “पण जर तुम्ही मला सांगत असाल की मोर्चा चालू राहील आणि बैठकही होईल, तर मी बैठक रद्द करतो आणि तुम्ही मोर्चा सुरू ठेवा,” असं म्हणत ते बाहेर पडले.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार पान खाऊन थुंकला, अध्यक्षांनी दिली समज
भोपाळमध्ये महापुरुषांच्या नावाने प्रवेशद्वार उभारणार
समाजवादी पक्षात औरंगजेबची आत्मा
माजी सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्याविरोधात एफआयआर करण्याच्या आदेशाला स्थगिती
मुख्यमंत्री मान यांनी बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर पडल्यानंतर काही तासांतच पंजाब पोलिसांनी शेतकरी नेत्यांच्या घरांवर मध्यरात्री धाडी टाकल्या. क्रांतिकारी किसान युनियनचे राज्य सरचिटणीस गुरमीत सिंग मेहमा यांनी एका व्हायरल व्हिडिओत सांगितलं की, मान बैठक सोडून बाहेर पडल्यावर पोलिसांनी शेतकरी नेत्यांच्या घरांवर धाडी टाकायला सुरुवात केली. त्यांनी असंही सांगितलं की, पंजाब पोलिसांनी त्यांना त्यांच्या फिरोजपूर येथील घरातून ताब्यात घेतलं आणि प्रतिबंधात्मक अटक केली.
BKU ने ‘चंदीगड चलो’ आंदोलन स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आणि सरकारनं दिलेल्या इतर आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी आयोजित केलं आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या राज्य आणि केंद्र सरकारवरील नाराजीचा परिणाम आहे, कारण शेतीविषयक समस्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष होतंय.