पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिली राम मंदिराला देणगी

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिली राम मंदिराला देणगी

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अयोध्येत होऊ घातलेल्या राम मंदिरासाठी दोन लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक खात्यातून हा निधी दिला आहे. यामुळे राम मंदिराला निधी देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये त्यांच्या नावाची भर पडली आहे.

अयोध्येतील राम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी देशभर निधी संकलन अभियान राबवले गेले. समाजच्या प्रत्येक स्तरातून या अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसला. प्रत्येक क्षेत्रातील अनेक बड्या हस्तींनी या मंदिर उभारणीसाठी आपले योगदान दिल्याचे दिसून आले. राजकीय वादांच्या पलीकडे जाऊन काँग्रेसचे सदस्य असणारे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राम मंदिराला दोन लाख रुपयांची देणगी देऊ केली आहे. या पूर्वी काँग्रेसच्या आमदार अदिती सिंह यांनी राम मंदिरासाठी ५१ लाखाचा निधी दिला आहे.

हे ही वाचा:

पवारांच्या नाराजीच्या पुड्या…

एकीकडे काँग्रेसचेच नेते राम मंदिर निधी संकलनावर टीका करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या, कुमारस्वामी यांनी निधी संकलना बाबत सवाल उपस्थित केले आहेत. पण त्यांच्याच पक्षाचे लोक राम मंदिर निधी संकलनाला प्रतिसाद देत त्यांना तोंडावर पाडत आहेत.

Exit mobile version