जालना लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार पुंडलिक दानवे यांचे निधन झाले आहे. सोमवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दानवे यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९५ वर्षांचे होते.
माजी खासदार पुंडलिक दानवे हे भोकरदन तालुक्याचे सुपुत्र म्हणून प्रसिद्ध होते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ते औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. वृद्धापकाळाने उद्भवणाऱ्या आजारांमुळे मृत्यूशी त्यांची झुंज सुरू होती. पण अखेर १ नोव्हेंबर रोजी त्यांची ही झुंज अपयशी ठरली. मंगळवार २ नोव्हेंबर रोजी भोकरदन तालुक्यातील दानवे यांच्या मूळ गावी म्हणजेच पिंपळगाव सुतार येथे दुपारी १ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुःखद बाब म्हणजे चार दिवसांपूर्वीच पुंडलिक दानवे यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. केशरबाई दानवे असे त्यांचे नाव होते.
हे ही वाचा:
जी-२० परिषदेत मोदींनी हवामान, शेती विषयाची केली यशस्वी मांडणी
अनिल देशमुखांना १०० दिवस ईडीच्या कोठडीत राहावे लागणार
नवाब मलिकांनी लवंगी लावला, मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन
पुंडलिक दानवे हे १९७७ साली आणि १९८९ साली खासदार म्हणून निवडून आले होते. १९७७ साली जनता दलाच्या तिकिटावर तर १९८९ साली भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर दानवे हे लोकसभेत निवडून गेले होते. साधी राहणी असणारे सर्वसामान्यांचे नेते अशी त्यांची ख्याती होती. शब्दप्रभू म्हणूनही ते प्रसिद्ध होते. दानवे यांच्या निधनाने जालन्यातील नागरिक शोकाकुल झालेले पाहायला मिळत आहेत.