27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणठाकरे सरकारमध्ये पब,डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात

ठाकरे सरकारमध्ये पब,डिस्को,बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात

Google News Follow

Related

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. या नियमावलीवरुन भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. ठाकरे सरकारचं काय चाललंय ते कळत नाही. गणेशोत्सव आणि कोरोना अटकाव याचा संबंध नाही. सरकारनं हा निर्णय घेताना कुणालाही विचारात घेतलं नाही. राज्य सरकारला डिस्को पब चालतात मग गणेशोत्सव का चालत नाही? असा सवाल शेलार यांनी केलाय.

गणेशोत्सवाबाबत एक एक नियम असे घातले आहेत की आता घरातल्या धातूच्या मूर्तीचं पूजन करावं लागेल. राज्य सरकारला डिस्को पब चालतात आणि गणेशोत्सव चालत नाहीत. गणेशमूर्ती बनवायला तीन महिने आधीपासून सुरुवात केली जाते. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मूर्तीकारांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यांना एक रुपयाचीही मदत दिली गेली नाही. ठाकरे सरकार बिनडोकपणे वागत आहे. त्याचा आपण निषेध करतो, असा घणाघात शेलार यांनी महाविकास विकास आघाडी सरकारवर केलाय.

हे ही वाचा:

सेंट्रल विस्टा विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा दणका

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा ठरल्या

महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरं भरलंय

मॉडर्ना ठरणार भारतातील चौथी कोरोना लस

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ४ फुटाच्या मूर्तीची तर घरगुती गणेशोत्सव मंडळांनी २ फुटाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद करण्यात आले आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे तातडीने जाहीर करावी अशी मागणी गणेश मूर्तिकारांकडून केली जात होती. ही मार्गदर्शक तत्त्वे अखेर सरकारने मंगळवारी जाहीर केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा