“आदित्य ठाकरेंच्या सांगण्याने पब आणि बार बिनधास्त सुरु”- देवेंद्र फडणवीस

“आदित्य ठाकरेंच्या सांगण्याने पब आणि बार बिनधास्त सुरु”- देवेंद्र फडणवीस

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाईट लाईफ आणि कोरोना निर्बंधांवरुन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असून तिथे त्यांचेच चालते. आदित्य ठाकरेंनी सांगितल्याने पब आणि बार बिनधास्त सुरु असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना हा फक्त शिवजयंती आणि अधिवेशनाच्या वेळी असतो नाईटलाईफला नसतो, असा टोला देखील त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात, म्हणून त्यांचेच मंत्री त्यांचे नियम धुडकावतात. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचं तिथली लोक सगळं ऐकतात. म्हणूनच त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे नाईटलाईफ सुरळीतपणे सुरू आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

“पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांची केविलवाणी अवस्था”

देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना हा फक्त शिवजयंतीसाठी आहे मात्र नाईटलाईफसाठी नाही का? असा सवाल उपस्थित केला. अधिवेशनाच्या वेळी कोरोना असतो आणि नाईट लाईफलला नाही. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांची वरळी नाईटलाईफवर जोरदार टीका केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स ३३ रुपये आहे. राज्य सरकारने २७ रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावे. असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Exit mobile version