मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, भाजपा नेत्याची मागणी

मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, भाजपा नेत्याची मागणी

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणातील प्रमुख दुवा असलेल्या मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यु झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएने करायला सुरूवात केली. परंतु तरीही मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी यासाठी भाजपा नेते किरट सोमय्या यांनी मागणी केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते किरिट सोमय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. आज सोमय्या यांनी थेट केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून, मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा: 

सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहण्याचा केंद्राकडून ठाकरे सरकारला सल्ला

राजन यांच्या बुद्धीचा मोदी द्वेषाने ताबा घेतलाय- अतुल भातखळकर

बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात

मनसुख हिरेन यांच्या मृत्युचा तपास एनआयएकडे आहे. याबाबत प्रमुख आरोपी एपीआय सचिन वाझे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयास्पद गाड्या देखील एनआयएने ताब्यात घेतल्या आहेत. एक पांढरी इनोव्हा गाडी वाझे यांना ताब्यात घेतल्यानंतर लगेच मिळाली होती. काल काळ्या रंगाची मर्सिडिज देखील एनआयएने पोलिस मुख्यालयातून ताब्यात घेतली. त्यावेळी या गाडीच्या नंबर प्लेट बदलल्या असल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच सचिन वाझेने त्याच्या सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज देखील डिलीट केल्याचे उघड झाले आहे.

Exit mobile version