मुंबई भाजपाने केली पालिका आयुक्तांकडे मागणी
मुंबई महानगरपालिकेकडे सुमारे ७० हजार कोटींच्या ठेवी असल्यामुळे महापालिका मोफत लशींचा बोजा सहज उचलू शकते. त्यामुळे मुंबईतील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
हे ही वाचा:
संजय राऊतांची वैचारिक पातळी लक्षात आली… भूषणसिंह कडाडले
आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, आमदार रणजीत कांबळेंविरुद्ध तक्रार दाखल
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर मिळणार काँग्रेसला अध्यक्ष
नमाज पढण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जण जखमी
या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या धोरणानुसार खाजगी रुग्णालये व राज्य सरकार आता लसीच्या ५० टक्के उत्पादनाची थेट खरेदी करू शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारच्या माध्यमातून लशींची खरेदी करून मोफत लसीकरणाला ताबडतोब सुरुवात करावी.
पत्रात पुढे म्हटले आहे की, देशात दुर्दैवाने महाराष्ट्र कोरोना बाधितांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर आहे तर मुंबई शहरही याबाबतीत पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी याचा उपयोग होईल.
मुंबईतील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस द्यावी अशी मागणी मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
सुमारे ७० हजार कोटीच्या ठेवी असल्यामुळे मोफत लसीचा बोजा महापालिकेला सहज उचलू शकते असे आम्ही सांगितले. pic.twitter.com/FSSqpipO2z— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 10, 2021
सध्या लसीकरणाच्या मुद्द्यावरून बरीच चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नाही म्हणून ठाकरे सरकारकडून सातत्याने ओरड केली जाते. त्याचवेळी आपले राज्य लसीकरणात कसे आघाडीवर आहे, असे जाहीर करून पाठही थोपटली जाते. त्यामुळे अशी ओरड करण्यापेक्षा पालिकेकडे असलेल्या या पैशाचा लसीकरण सुरळीत होण्यासाठी उपयोग होईल, या अनुषंगाने मुंबई भाजपाने ही मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विरोधी पक्षनेते विधान परिषद प्रवीण दरेकर, भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर, आमदार आशीष शेलार आदि नेत्यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्तांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले.