कशिद कोपर या पालघरमधील गावात पाण्याची टाकी हटविण्यावरून केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी १०० साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात या सर्व आंदोलकांना पोलिसांनी बसेसमधून पोलिस स्टेशनमध्ये नेले आणि तिथे त्यांना बसविण्यात आले.
कशिद कोपर भागात एमएमआरडीएने पाण्याची टाकी बसविली असून त्या टाकीमुळे आम्हाला धोका संभवतो असे म्हणत आंदोलक या टाकीला विरोध करत आहेत. ही टाकी अन्यत्र हलविण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. गाव बचाव संघर्ष समितीचा विजय असो, टाकी हटवा गाव वाचवा अशा घोषणा देत आंदोलक पोलिसांसोबत पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी सर्व आंदोलकांनी खासगी बसेसमध्ये बसवून त्यांना मांडवी पोलिस ठाण्यात आणले.
हे ही वाचा:
‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’
‘हनुमान चालीसा वाचायची असेल आपल्या घरात वाचा’
झवेरी बाजारात भिंतीत लपवले होते १० कोटी आणि चांदीच्या विटा
२१ मार्चपासून हे उपोषण सुरू होते. शेवटी २६ दिवसांनी पोलिसांनी सकाळी ११ वाजता कशिद कोपर येथून मांडवी पोलिस स्टेशनला आंदोलकांना नेण्यात आले. नव्याने बांधण्यात आलेल्या मांडवी पोलिस ठाण्यात वरच्या मजल्यावर ६० महिला व ४० पुरुष अशा १०० आंदोलकांना ठेवण्यात आले.
यासंदर्भात रामचंद्र देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी सांगितले की, लोकांना या टाकीसंदर्भात काही गैरसमजुती होत्या. टाकी उभारल्यामुळे आपला जीव धोक्यात येईल अशा भीतीतून २५-२६ दिवसांसाठी हे उपोषण सुरू होते. त्यांच्याशी संवाद साधला पण त्यांच्या मनात भीती असल्यामुळे ते आंदोलन सुरूच ठेवले होत. त्यामुळे त्यांनी स्वतःहून अटक करून घेतली. टाकी इतरत्र हलवावी अशी त्यांची मागणी होती. २००० साली आधीच ही टाकी अन्य ठिकाणाहून हलविण्यात आली होती. खरे तर, हे आंदोलन शांततेत सुरू होते, पण एमएमआरडीएचे काम ते होऊ देत नव्हते म्हणून त्यांना ताब्यात घ्यावे लागले.