आंदोलकांनी तलवारी नाचवल्या

आंदोलकांनी तलवारी नाचवल्या

दिल्लीत प्रजासत्ताक दिनालाच आंदोलकांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला. दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी अनेक बस आणि गाड्या फोडल्या आहेत.

दिल्लीत गेले दोन महिने शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या नावाखाली आंदोलन सुरु आहे. दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकरी तळ ठोकून बसले होते. आंदोलन स्थळाला जत्रेचे रूप देण्यात आले होते. अनेक सिनेमागृहे, व्यायामशाळा, वाचनालये तिथे बांधण्यात आली होती. याचबरोबर मसाज सेंटर देखील सुरु करण्यात आले होते. अनेक आंदोलकांच्या रोजच्या जेवणाची सोय देखील करण्याची क्षमता या आंदोलनस्थळांची होती. अनेक महिने तग धरून ठेवण्याची मानसिक तयारी तर यांची होतीच परंतु त्याचबरोबर त्यांना त्या पद्धतीची रसदही पुरवली जात होती.

जानेवारी महिन्याच्या सुरवातीला आंदोलकांच्या नेत्यांनी ट्रॅक्टर रॅली काढणार असल्याची घोषणा केली होती. प्रजासत्ताक दिनालाच ट्रॅक्टर रॅलीचा घाट आंदोलक घालणार होते. केंद्र सरकारने तरीही सामंजस्याची भूमिका घेऊन आंदोलकांना रॅलीसाठी मार्ग आखून दिला. परंतु सकाळीच आंदोलकांनी आखून दिलेला मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने ट्रॅक्टर रॅली सुरु झाली.

आंदोलकांनी बॅरिकेड्स मोडून ट्रॅक्टर रॅली सुरु केली. आंदोलनकर्त्यांनी पोलीस आणि पत्रकारांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतील सरकारने शेतकऱ्यांसाठी फुकट इंटरनेट पुरवले होते. मात्र आता सरकारने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सिंघू आणि टिकरी बॉर्डरवरील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हिंसक आंदोलन करण्याचा डाव्या शेतकरी संघटनांचा छुपा अजेंडा उघड झाला आहे.

Exit mobile version