बॅरिकेड्स हटविण्यासाठी तीव्र आंदोलन, आमदार भातखळकर यांना अटक

बॅरिकेड्स हटविण्यासाठी तीव्र आंदोलन, आमदार भातखळकर यांना अटक

ऑगस्ट महिन्यात मालाडच्या जनतेने दफ्तरी रोडवर उभारण्यात येणाऱ्या स्काय वॉकविरोधात आवाज उठविल्यावर स्कायवॉक रद्द कऱण्यात आला खरा, पण अद्याप रस्त्यांवर बॅरिकेड्स ठेवून लोकांना निष्कारण त्रास दिला जात असल्याबद्दल भाजपा नेते अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अटक केली पण हजारदा अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

तानाशाही नही चलेगी, अतुल भातखळकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी अटक केली. जोपर्यंत बॅरिकेड्स काढण्यात येत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, हजारदा अटक झाली तरी बेहत्तर, असा इशारा आमदार भातखळकर यांनी यावेळी दिला.

याठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांनी महापालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या या स्कायवॉकला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे १९ ऑगस्टला हा स्कायवॉक बांधण्याचा निर्णय रद्द करण्यात आला पण त्याठिकाणी बॅरिकेड्स मात्र तसेच ठेवण्यात आले होते. त्यामुळे तिथे रहदारीचा पुरता बोजवारा उडाला होता. नागरिकांनाही चालण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे जर स्काय वॉक रद्द करण्यात आलेला आहे तर बॅरिकेड्स कशाला हवेत, असा सवाल विचारत आमदार भातखळकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ३० नोव्हेंबरला मंगळवारी हे आंदोलन घेण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आमदार भातखळकर यांना ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला; मुंबईत शाळा १५ डिसेंबरपासून

एलन मस्क भारतीय प्रतिभेवर खुश

‘पाप झाकण्यासाठी कोरोनावर खापर फोडायचे, फ्रंटलाईन वर्कर्सने केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेने मिरवायचे’

 

मालाड स्टेशन पूर्व ते पुष्पा पार्क हायवे या दरम्यान हा स्कायवॉक बांधण्याचा इरादा होता. पण त्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ होणार होती. आधीच हा मार्ग प्रचंड वाहतुकीचा, रहदारीचा, वळणांचा असल्यामुळे त्यात स्कायवॉकची भर कशाला असा स्थानिकांचा प्रश्न होता. स्कायवॉक बांधण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्यानंतर अजूनही तिथे बॅरिकेड्स मात्र तसेच ठेवण्यात आले होते.

 

Exit mobile version