तेलंगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध! दगडफेकीनंतर जमावबंदी लागू

तेलंगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध! दगडफेकीनंतर जमावबंदी लागू

महाराष्ट्रात आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पण असे असताना तेलंगणात मात्र छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वादंग पाहायला मिळत आहे. तेलंगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हा पुतळा स्थापन करण्यावरून वाद उसळला आहे. एमआयएमने हा पुतळा स्थापन करायला विरोध केला आहे.

तेलंगणातील बोधन भागात असलेल्या आंबेडकर चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापन करण्यासाठी भारतीय जानता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आग्रही होते. पण याला ओवैसींच्या एआयएमएम या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.

हे ही वाचा:

… म्हणून इम्रान खान यांनी केलं भारताचं कौतुक

लक्ष सेन स्पर्धा हरला, पण मने जिंकून गेला

‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र लाभ घेते पवार सरकार’

राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह…

वास्तविक बोधन महानगरपालिकेच्या क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी केली जात होती. बोधन महापालिकेने हा प्रस्ताव मान्य केला होता. पण असे असले तरीही महापालिकेने हा पुतळा कुठे बसवावा यासाठी कोणतीही जागा निश्चित केलेली नाही. तसेच हा पुतळा बसवण्यासाठी कोणतीही लेखी परवानगी देण्यात आलेली नाही.

याच मुद्द्यावरून एमआयएम आणि इतर स्थानिक अल्पसंख्यांक संस्थांनी हा पुतळा बसवण्याला विरोध केला आहे. यामध्ये तेलंगणातील सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती यांनीही विरोध केला आहे. महापालिकेच्या परवानगीनंतरच हा पुतळा बसवण्यात यावा असे या संस्थांचे म्हणणे आहे. पण या सर्वात हा वाद चिघळला असून दगडफेक पाहायला मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी सध्या या भागात कलाम १४४ लागू केले आहे.

Exit mobile version