महापुरुषांसाठी की शिंदे-फडणवीस सरकारला विरोध करण्यासाठी महामोर्चा?अशोक चव्हाण यांची मोर्चकडे पाठ
महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल मोर्चा सुरु आहे. या मोर्चात ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी झाले आहेत. या मोर्च्यात ठाकरे कुटुंबीय, अजित पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यासह अनेक महाविकास आघाडीचे नेते मोर्च्यात सहभागी झाले आहेत. मात्र, महापुरुषांसाठी काढलेल्या या मोर्चात आदित्य ठाकरे नेहमीप्रमाणे ५० खोक्यांच्या घोषणा देत आहेत.
तसेच महाविकास आघाडीच्या या मोर्चाला काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी मात्र दांडी मारल्याचं दिसून आले आहे. अशोक चव्हाण यांच्या अनुपस्थितीवर काँग्रेस नेते नाराज असल्याचं म्हटले जात आहे. महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील सदस्याचा नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील. कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी, असं त्यांनी म्हटले आहे. परंतु, निकटवर्तीयांच्या लग्नासाठी पत्नी अमिता चव्हाण यांना पाठवून अशोक चव्हाण स्वतः या मोर्चात सहभागी होऊ शकले असते, असा काँग्रेसच्या नेत्यांचा सुर आहे.
हे ही वाचा:
उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल
‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’
या मोर्च्यामध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तसेच अजित पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज चव्हाण यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत. तसेच शरद पवार हे मोर्चामध्ये सहभागी न होता थेट सभास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या मोर्चामध्ये रश्मी ठाकरे यांनी राजकीय प्रतिक्रिया देणं टाळले आहे.