28 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणदूध दरवाढीसाठी सदाभाऊ खोतांचा मंत्रालयावर मोर्चा

दूध दरवाढीसाठी सदाभाऊ खोतांचा मंत्रालयावर मोर्चा

Google News Follow

Related

कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यातच दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं आहे. त्यामुळे दूध दरवाढ मिळावी म्हणून रयत क्रांती संघटनेने आज अनोखं आंदोलन केलं. संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी स्वत: दुधाचा कॅन खांद्यावर घेऊन हे आंदोलन केलं. खोत आणि आंदोलक दुधाची कॅन खांद्यावर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने आल्याने पोलिसांची एकच पळापळ झाली. यावेळी खोत यांचा मोर्चा मध्येच अडवण्यात आला. त्यामुळे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.

आज सकाळी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि आंदोलकांनी दुधाच्या कॅन खांद्यावर घेऊन मंत्रालयाकडे निघाले. यावेळी ‘दुधापेक्षा पाणी महाग, आघाडी सरकारला कधी येणार जाग’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यामुळे मंत्रालय परिसर दणाणून गेला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन खोत यांचा मोर्चा मध्येच अडवला. यावेळी खोत यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी खोत यांनी दुग्धविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यांची मंत्रालयामध्ये भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे सचिवांनी आश्वासन दिल्याचं खोत म्हणाले.

हे ही वाचा:

भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

येत्या निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील

११,६१७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंदच नाही

मालवणीतील दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऎरणीवर

ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये ऊसासाठी किमान आधारभूत किंमत एफआरपी आहे. त्याच धर्तीवर दुधालाही एफआरपी किंवा एमएसपी मिळावी. महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना समान भाव देणे गरजेचे आहे. ऊसासाठी रंगराजन समितीच्या शिफारसीनुसार ७०/३० चा फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे दूध उत्पादकांसाठी किमान ८५/१५ चा फॉर्म्युला करणे गरजेचे आहे. सध्या कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघामध्ये ८१/१९ चा फॉर्म्युला कार्यरत आहे. १९६६-६७ नंतर संकरीकरणाचा तंत्रज्ञान युक्त वापर दिसत नाही. गिर, धारपारकर हे आमचे गायी ब्रीड जागतिक आदर्शवत आहेत, या जातींच्या गायींचे संगोपन होणे गरजेचे आहे. दुधाला भाव नसल्यामुळे महाराष्ट्रात अनेक दूध उत्पादकांनी आत्महत्या केल्या आहेत. किमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या दराप्रमाणे दूध उत्पादकांना भाव मिळणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा