१२ आमदारांचे निलंबन; ठाकरे सरकारविरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांची संतप्त निदर्शने

१२ आमदारांचे निलंबन; ठाकरे सरकारविरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांची संतप्त निदर्शने

कांदिवली पूर्व येथे शेकडो भाजपा कार्यकर्त्यांना अटक

विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बनाव रचून करण्यात आलेल्या भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाविरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संतप्त निदर्शने केली. जनताही या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सामील झाली. कांदिवली पूर्व येथे पोलिसांनी बळाचा वापर करून भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली.

विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवून तालिका अध्यक्षांनी आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, राम सातपूते, हरीश पिंपळे, संजय कुटे, जय कुमार रावल, नारायण कुटे, बंटी भांगडीया या भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले. शिवी शिवसेनेच्या आमदाराने घातली होती, अशी माहिती उघड झाली, परंतु ठपका मात्र भाजपा आमदारांवर ठेवण्यात आला.

हे ही वाचा:
ठाकरे सरकार, आता तरी लोकलमध्ये शिरू द्या!

ठाकरे सरकारने काढली लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा

२ महिन्यात राज्यातील ७ कोटी ‘गरिबांचे कल्याण’

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांच्या पोटात खड्डा!

लोकशाही बुडवणाऱ्या या निर्णयाविरोधात आमदार अतुल भातखळकर यांच्या कांदीवली पूर्व विधानसभेत कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन सकाळीच रस्त्यावर उतरले. वसूली सरकारचा निषेध असो, ठाकरे सरकार हाय, हाय… अशा घोषणा देऊन त्यांनी संतप्त निदर्शनने केली. निलंबनाने जनतेतही असलेला आक्रोश यानिमित्ताने समोर आला. आंदोलन जनताही उत्स्फूर्तपणे सामील झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना अटक केली.

‘हे ठरवून रचलेले कारस्थान होते. सरकारविरुद्ध सातत्याने आक्रमक असलेल्या आमदारांना हा बनाव रचून लक्ष्य करण्यात आले. त्यांना विधीमंडळाच्या कामकाजापासून दूर ठेवण्याचा हा डाव आहे. १७० आमदार हाताशी असून ठाकरे सरकारची तंतरली आहे’, अशी जळजळीत टीका करून मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी सरकारची खेळी उघड केली. कांदिवली पूर्वसह मुंबईत अन्य ठिकाणीही ठाकरे सरकारच्या या काळ्या कृत्याचा जळजळीत निषेध करण्यात आला.

Exit mobile version