राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरुंगात आहेत. आज, १३ एप्रिल रोजी ईडीने मलिकांची मालमत्ता जप्त केली आहे. मलिक यांच्या एकूण आठ मालमात्तेवर इडीने टाच आणली आहे.
कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडसह आठ मालमत्ता नबाव मलिकांच्या ईडीने जप्त केल्या आहेत. यामध्ये उस्मानाबादमधील १४७ एकर जमीन, कुर्ल्यातील संपूर्ण गोवावाला कंपाउंड, व्यावसायिक जागा तसेच कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट्स आणि २ राहती घर अशी मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. या मालमत्तांची किंमत अजून समोर आली नसली तरी अनेक करोडोंची ही मालमत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
२३ फेब्रुवारीला मलिकांना ३ मार्च पर्यंत ईडीने कोठडी सुनावली होती. पुढे ईडीने मलिकांची रवानगी तुरंगात केली. गेल्या दीड महिन्यापासून मलिक तुरुंगात आहेत. तेव्हापासून ईडीने त्यांच्या अनेक मालमत्ता पडताळल्या होत्या त्यातूनच हीमाहिती समोर आली आहे. ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याबद्दल मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ईडीने केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हणत न्यायालयाने नवाब मलिक यांना फटकारले होते. त्यानंतर २ एप्रिल रोजी मलिकांनी या संदर्भातच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
हे ही वाचा:
गुणरत्ने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलीस घेणार
दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयाला भेट
‘मुंब्र्यात कोंबिंग ऑपरेशन करा’
न्यूयॉर्क सबवे स्टेशनवर गोळीबार, १३ जखमी
यावर भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देतना म्हटले की, शरद पवार हे नवाब मलिक यांना पाठीशी घालत आहेत. मलिकांच्या मालमत्ता जप्त झाल्या तरी अजून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठीशी घालणे सोडलेले नाही. त्याचउलट आम्ही काही केले नसताना फक्त संजय राऊत म्हणतात म्हणून किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अशी टीका भातखळकरांनी मलिकांवर केली आहे.