शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण हे चिन्ह नेमके कुणाचे यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्या अशिलाची बाजू मांडली आणि त्यात शिवसेनेत फूट झालेलीच नाही, असा दावा केला. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी पक्षातून मोठा गट लोकप्रतिनिधींसह बाहेर पडला तर तो बेकायदेशीर कसा? यानंतर सुनावणी २० जानेवारीला ठेवण्यात आली असून त्यावेळी चिन्ह आणि पक्ष कुणाचा याचा निर्णय लागेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कपिल सिब्बल म्हणाले की, शिवसेनेतील फूट ही कपोलकल्पित आहे. शिंदे गट ही शिवसेना नाही. जे आमदार बाहेर पडले ते स्वतःहून बाहेर पडले आहेत. शिवसेना फुटीचा पक्षावर परिणाम झालेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे ही फूट ग्राह्य धरू नये, असे त्यांनी सांगितले. सिब्बल यांनी यावेळी शिवसेना पक्षाची घटनाही वाचून दाखविली.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब
जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय
पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण
महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक
कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला पण १७ जानेवारीला या सुनावणीचा अंतिम निकाल येण्याची शक्यता फार कमी आहे. कदाचित या आठवड्यात या प्रकरणी निर्णय होईल, अशी शक्यता आहे. सिब्बल यांनी असेही म्हटले की, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या प्रकरणावर निर्णय घेऊ नका. सिब्बल यांनी शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रे बनावट असल्याचे म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने ही सर्व कागदपत्रे तपासून पाहावीत, कागदपत्रांची छाननी करावी, अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली. जेठमलानी म्हणाले की, संख्याबळ शिंदे गटाकडे असल्यामुळे चिन्हाचा निर्णय लवकर घ्यावा. आमच्या कागदपत्रांत कोणत्याही चुका नाहीत शिवाय आमचे संख्याबळ जास्त असल्याने लवकर चिन्हाचा निर्णय घ्यावा.