अनिल देशमुख : मिस्टर इंडियानंतर आता ‘कर्ज’ चुकाना है

अनिल देशमुख : मिस्टर इंडियानंतर आता ‘कर्ज’ चुकाना है

सध्या गायब असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. ईडीने चार वेळा समन्स बजावूनही ते ईडीसमोर उपस्थित राहिले नाहीत. त्यातच त्यांनी गैरपद्धतीने कर्ज घेतले असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या तक्रारीनंतर वसुली प्रकरणाचा तपासही सुरू केला. या प्रकरणी ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीला त्याच्या तपासात असे आढळून आले की, देशमुखांनी अनेक खाजगी बँकांकडून बेकायदेशीर कर्जे घेतली आहेत. याबाबतीत काही ठोस पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. कर्जासाठी करायच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे समोर येत आहे.

हे ही वाचा:

दोन हॅन्ड ग्रेनेडसह पत्रकार आदिल फारूकला अटक

राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महावितरणच्या दिव्याखाली मिट्ट अंधार!

छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी

अनिल देशमुखांनी अवैधरित्या कर्जे घेतली असल्यास त्यांना यात कोणी मदत केली आहे, याचा देखील तपास केला जात आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, देशमुख यांनी या कर्जाची रक्कम देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या कंपन्यांना हस्तांतरित केली. अधिक चौकशी करता असेही आढळून आले की, यातील काही कंपन्या खऱ्या आहेत तर काही शेल कंपन्या आहेत. याबाबतीतील अधिक चौकशी देखील ईडीकडून केली जात आहे.

अनिल देशमुखांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी ईडीला पोलिसांच्या बदल्यांमध्ये खासकरुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हात होता. परमबीर सिंह यांनी ४ मार्चला ज्ञानेश्वरी इथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे आरोप आपल्या तक्रारीमध्ये केला होता. ती बैठक झाल्याची कबुली देखील पलांडे यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिली आहे.

Exit mobile version