महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून उद्योजकांसाठी महाराष्ट्रात उद्योग करणे अवघड होत चालले असल्याचे आढळून येऊ लागले होते. मुंबईतील वसुलीचे आरोप ताजे असतानाच, आता औरंगाबादमध्ये देखील उद्योजकांना त्रास देण्याचे प्रकार समोर आले आहेत.
प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांच्या भोगले ऑटोमेटिव्ह प्रा. लि कंपनीत १०-१५ गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या गुंडांनी कंपनीत शिरून सीईओ नित्यानंद भोगले यांना मारहाण केली. नित्यानंद भोगले हे निर्लेप कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांचे बंधु आहेत.
या कंपनीतील एक कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने त्याला दुसरं काम देण्यात आले. मात्र या रागातून टोळक्याने कंपनीत येऊन हल्ला केला असे समजले आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये उद्योजकांवरील वाढत्या दादागिरीचा आणि गुंडगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या बद्दल अनेक उद्योजकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशी गुंडगिरी होणार असेल तर उद्योग दुसरीकडे हा हलवू नयेत असा संतप्त सवाल देखील उद्योजकांकडून केला गेला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकारच्या गुंडगिरीला आवर घालण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे.
हे ही वाचा:
छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?
नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान
पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!
मारहाण करताना एका कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र खरोखरच कोणत्या कर्मचाऱ्यावर कोणत्या प्रकारचा अन्याय झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. दुर्दैवाने ही मारहाण लोकांना दिसावी यासाठी करण्यात आली. कंपनीचे सीईओ नित्यानंद भोगले यांना सीसीटीव्ही कुठे आहे हे विचारून तिथे नेऊन मारहाण करण्यात आली सीईओ नित्यानंद भोगले यांच्या सोबतच त्यांचे एच आर मॅनेजर तसेच तेथे उपस्थित आणखी एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली.
राम भोगले यांच्या ‘निर्लेप कंपनी’ने औरंगाबादचे नाव जगात पोहोचवले होते. या घटनेनंतर औरंगाबाद परिसरातल्या सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या तिघांना अटकदेखील करण्यात आली. मात्र, मारहाण मुख्य व्यक्ती अद्यापही फरार आहे.
औरंगाबादमधील गुंडगिरीची ही एकमेव घटना नसल्याचे देखील समोर आले आहे. गुंज टू व्हिलर शोरूम मधून फुकट गाड्या नेतात. त्याबरोबच येऊन फुकट पेट्रोल भरून जातात. काही हॉटेलमध्ये जाऊन फुकट जेवण करतात. त्यामुळे येथील उद्योजक, व्यापारी हैराण झाले असल्याचे देखील कळले आहे.
या घटनेनंतर औरंगाबादमध्येम कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जातीय दंगली, पाण्याची कमतरता असे प्रश्न असतानाच आता गुंडगिरीही घडू लागली तर येथे उद्योग करावा कसा असा प्रश्न देखील केला जात आहे.
दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाईं यांच्याकडून सरकार उद्योगांच्या पाठी ठामपणे उभे असल्याचे तोंडी आश्वासन देखील त्यांनी दिले. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, असे देखील ते म्हणाले.