पाक समर्थक इम्रान खानला अमेठीत अटक

पाक समर्थक इम्रान खानला अमेठीत अटक

उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अमेठीतील एका गावात ‘इम्रान खान’ हा सरपंच म्हणून निवडून आला. निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच या इम्रान खानने विजयी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत इम्रान खानने पाकिस्तानी झेंडे मिरवले तसेच पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. या देशविरोधी कृत्यानंतर या सरपंचाला अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेला इसम इम्रान खान हा अमेठी जिल्ह्यातील रामगंज भागातील मांगरा गावातील सरपंच म्हणून निवडून आला होता. २ मे रोजी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाबरोबरच उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल देखील लागले. या निकालानंतरच इम्रान खान हा सरपंच म्हणून निवडून आला होता.

इम्रान खानने ४ मे रोजी विजय मिरवणुकीत, “देखो इम्रान खान आया, नाय पाकिस्तान लाया” हे गाणे लावले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली. या मिरवणुकीची व्हिडिओ क्लिप वायरल झाली होती. यानंतर जिल्हाधिकारी अरुण कुमार यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. ६ मे रोजी इम्रान खान आणि त्याच्या समर्थकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आणि ७ मे रोजी त्यांना अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या प्रदीप शर्मांवरही आता खंडणीचा आरोप

भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

महाराष्ट्रात सापडले ५३,६०५ नवे कोरोना रुग्ण

पीएम केअर्समधून मिळालेले ६० व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून

“देखो इम्रान खान आया, नाय पाकिस्तान लाया” हे गाणं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सत्तेत आल्यावर त्यांच्या समर्थकांनी लावलं होतं. परंतु भारताविरुद्ध विशेषतः काश्मीरच्या मुद्द्यावरून गरळ ओकणाऱ्या इम्रान खान यांचंच गाणं अमेठीतून निवडून आलेल्या इम्रान खान यांनीही लावलं.

Exit mobile version