प्रियांका गांधींनी केले परिवारवादाचे समर्थन; म्हणाल्या, श्रीराम, पांडवही परिवारासाठीच लढत होते!

राहुल गांधींच्या समर्थनार्थ सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन, तेथील भाषणात केले उपस्थितांना भावनिक

प्रियांका गांधींनी केले परिवारवादाचे समर्थन; म्हणाल्या, श्रीराम, पांडवही परिवारासाठीच लढत होते!

काँग्रेसवर सातत्याने परिवारवादाचे आरोप झालेले आहेत. राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बोलताना प्रियांका गांधी यांनी परिवारवादाचे समर्थन केले. त्यासाठी त्यांनी चक्क प्रभू श्रीराम आणि पांडवांचाही आधार घेतला.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, भगवान राम कोण होते? भगवान रामाला वनवासात पाठविण्यात आले. श्रीरामाने परिवारासाठी आपला परिवार आणि धरतीप्रती आपल्या धर्माचे पालन केले. पण ते परिवारवादी होते का? पांडवही परिवारवादी होते. परिवाराच्या संस्कारांसाठी लढले. आमच्या परिवारातील सदस्य देशासाठी शहीद झाले त्याबद्दल आम्हाला लाज वाटली पाहिजे का? या झेंड्यात त्यांचे रक्त आहे, या जमिनीत आमचे रक्त आहे. या धरतीा माझ्या परिवाराने आपल्या रक्ताने न्हाऊ घातले आहे. जे विचार करतात की, आम्हाला अपमानित करून आम्हाला धमकावता येईल, छापे टाकून त्यांनी लक्षात ठेवावे की आम्ही घाबरणार नाही. आम्ही मजबुतीने लढू. देशाच्या लोकशाहीसाठी आम्ही काहीही करू.

हे ही वाचा:

वैभव मांगले म्हणतोय ‘भय इथले संपत नाही!’

खलिस्तानींच्या हल्ल्यांविरोधात भारताने कॅनडा सरकारला ठणकावले!

करतारपूर साहिबला भेट देणाऱ्या यात्रेकरूंवर पाकिस्तानची शुल्क सक्ती

अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची ‘पासिंग आऊट परेड’

प्रियांका गांधी यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अंत्ययात्रेचा प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या की, माझ्या वडिलांची अंत्ययात्रा निआली होती. आम्ही गाडीत बसलो होतो. काही अंतर चालल्यावर राहुल म्हणाले की, मला उतरायचे आहे. पण सुरक्षेची चिंता होती. उतरू नको असे आईने सांगितले. मी म्हटले उतरू द्या. ज्या लष्कराच्या वाहनावर वडिलांचे पार्थिव ठेवले होते, त्या ट्रकमागून तो चालू लागला. त्रिमूर्तीपासून कडक उन्हात वडिलांच्या पार्थिवासह तो काही अंतर चालत गेला. भाषणाच्या या ठिकाणापासून काही अंतरावर त्याने अंत्यसंस्कार केले. अजूनही ते चित्र आहे. तिरंग्यात लपेटले होते. या शहीद वडिलांच्या मुलाला मीर जाफर म्हटले गेले.

Exit mobile version