‘उ. प्रदेशमधील पराभवासाठी प्रियांका गांधींचा राजीनामा घ्या’

‘उ. प्रदेशमधील पराभवासाठी प्रियांका गांधींचा राजीनामा घ्या’

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाला गांधी परिवाराचे नेतृत्त्व जबाबदार असल्याचे अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे. मात्र, आता उत्तर प्रदेश काँग्रेसचे निलंबित प्रवक्ते जीशान हैदर यांनी थेट प्रियंका गांधी यांचा राजीनामा मागून खळबळ उडवून दिली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी आता करण्यात येत आहे. पराभवानंतर पक्षाने सहा वर्षांसाठी हाकलून दिलेला जीशान हैदर यांनी प्रियंका गांधी वड्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली आहे. जीशान हैदर यांनी मंगळवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून प्रियंका गांधी वड्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

याआधी जेव्हा- जेव्हा राज्यात निवडणुकीचे निकाल वाईट आले, तेव्हा उत्तर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि प्रभारी दोघांनीही राजीनामा दिला आहे. अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी राजीनामा दिला आहे, आता प्रियंका गांधी वड्रा यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी जीशान यांनी केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून जीशान हैदर यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांना ४०३ जागा देऊनही झालेल्या पराभवाला जबाबदार धरले आहे.

हे ही वाचा:

तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर प. बंगालमध्ये १० जणांना जिवंत जाळलं 

‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’

‘राष्ट्रीय महामार्गांवर ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असेल’

ट्राउझरमध्ये लपवले होते ३ हजार हिरे

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी राजीनामा दिल्यानंतर आता प्रियांका गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षांतर्गत जोर धरू लागली आहे. पराभवाची जबाबदारी कोणाची नसून ती सर्वांची आहे, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या उच्च पदांवर बसलेल्यांनाही आत्मपरीक्षण करावे लागेल आणि उत्तर प्रदेश निवडणुकीतील पराभवाची सामूहिक जबाबदारी घ्यावी लागेल, असे हैदर यांनी म्हटले. यापूर्वी काँग्रेसने जीशान हैदर यांच्यावर काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केल्याबद्दल कारवाई केली होती. जीशान हैदर यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली.

Exit mobile version