पोलंडच्या राजदूताने केला शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींच्या खोट्या दाव्याचा पर्दाफाश

पोलंडच्या राजदूताने केला शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींच्या खोट्या दाव्याचा पर्दाफाश

शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या खोट्या डाव्यांचा पर्दाफाश झाला आहे. ट्विटरच्या माध्यमातून प्रियांका चतुर्वेदी यांनी पोलंडमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांविषयी खोटी माहिती पसरवली होती. पण पोलंडच्या भारतातील राजदूताने प्रियांका चतुर्वेदी यांचा दावा खोटा असल्याचे उघड केले आहे. यामुळे प्रियांका यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे. खासदार असलेल्या प्रियांका यांनी जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे असा सूर नेटकऱ्यांकडून उमटताना दिसत आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीय नागरिक शेजारच्या देशांमध्ये प्रवेश करत आहेत आणि तिथून भारत सरकार या नागरिकांना वाचवत आहे. पण प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करत असा दावा केला होता की पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाहीये. तर आधी ज्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता त्यांनाही परत पाठवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

‘भारतीयांना मायदेशात परत आणण्याची मोहीम काय शिवसेनेने सुरू केली का?’

शार्क टँक इंडिया फेम ‘भारत पे’चे सह- संस्थापक अश्नीर ग्रोव्हर पायऊतार

युक्रेनला भारताकडून मदतीचा हात

‘दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी ठाकरे सरकारकडे वेळ आहे’

पण या ट्विटला भारतातील पोलंडच्या राजदूताने उत्तर देत चतुर्वेदी यांची पोलखोल केली आहे. पोलंडचे भारतातील राजदूत ऍडम बुरकोवस्की यांनी प्रियांका यांचे खोटे उघड केले आहे. ही माहिती खरी नसून युक्रेनमधील कोणालाही पोलंडमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर चतुर्वेदी यांनी आपली बातमीचे सूत्रे तपासून घ्यावीत आणि खोट्या बातम्या पसरवू नयेत अशी सणसणीत चपराक त्यांनी लगावली आहे.

तर यावरूनच महाराष्ट्र भाजपानेही चतुर्वेदी यांना चिमटा काढला आहे. जेव्हा खोटं बोलण्याचा आणि ते खोटं उघडं पडण्याचा विषय येतो तेव्हा चतुर्वेदी या संजय राऊतांच्याही वरिष्ठ झाल्या आहेत असे भाजपा महाराष्ट्राने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय राऊतांचे खोटे राष्ट्रीय पातळीला उघडे पडते तर चतुर्वेदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळी गाठली आहे.

Exit mobile version